CPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय

मुंबई इंडियन्सच्या ( MI) या खेळाडूनं CPL 2020त 51.75 च्या सरासरी अन् 204.95च्या स्ट्राइक रेटनं 207 धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 04:40 PM2020-09-12T16:40:56+5:302020-09-12T16:41:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Mumbai Indians Kieron Pollard reaches Dubai with his family | CPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय

CPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देCPL 2020त 51.75 च्या सरासरी अन् 204.95च्या स्ट्राइक रेटनं 207 धावा 28 चेंडूंत 72 धावांच्या वादळी खेळीचाही समावेश, 12 सामन्यांत 20 षटकार

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वात गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी चार जेतेपद नावावर केली आहेत. 19 सप्टेंबरला अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स ( MI) मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना करण्यासाठी उतरणार आहे. पाचव्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स ( MI) सज्ज आहे.

राजस्थान रॉयल्स 2008चा मॅजिक IPL 2020तही दाखवणार; स्टीव्ह स्मिथ इतिहास रचणार?   

आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( MI) एका खेळाडूनं कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL 2020) गाजवली. त्याच्या नेतृत्वाखाली शाहरूख खानचा ( Shahrukh Khan) मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 सलग 12 सामने जिंकले. अंतिम सामन्यात नाइट रायडर्सने ( TKR) डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाला हार मानण्यास भाग पाडले. यात MIच्या अष्टपैलू खेळाडूचा फार मोठा वाटा आहे. 

अरेरे... चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पोहोचला थेट पार्किंगमध्ये, Video

मुंबई इंडियन्सच्या ( MI) या खेळाडूनं CPL 2020त 51.75 च्या सरासरी अन् 204.95च्या स्ट्राइक रेटनं 207 धावा चोपल्या. यात त्याच्या 28 चेंडूंत 72 धावांच्या वादळी खेळीचाही समावेश आहे. 12 सामन्यांत त्यानं 20 षटकार खेचले, शिवाय 8 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात 30 धावांत त्यानं 4 विकेट्स घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सनंही TKRच्या विजयाचा आनंद साजरा केला, तो याच खेळाडूच्या कामगिरीमुळे. आता हा खेळाडू UAEत दाखल झाला आहे. MIनं त्याचा फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आहे.  

CPL Final : शाहरुख खानच्या संघानं जेतेपदाचा चौकार मारला; मुंबई इंडियन्सनं अनोखं सेलिब्रेशन केलं

KKRनं मोठा डाव टाकला; CPL विजेत्या संघातील हूकमी खेळाडू IPL2020त खेळणार!

IPL मधील कामगिरी
मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू असलेल्या किरॉन पोलार्डनं IPLमध्ये 148 सामन्यांत 2755 धावा केल्या आहेत. त्यात 14 अर्धशतकांचा समावेश असून 83 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. IPL मध्ये त्यानं 181 चौकार व 176 षटकार खेचले आहेत. त्याच्या नावावर 56 विकेट्सही आहेत. 

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर...

मुंबई इंडियन्स Mumbai Indians Players List (MI)  - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Mumbai Indians Schedule, IPL 2020 )

19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
4 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजाह
6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह
 

Web Title: IPL 2020 : Mumbai Indians Kieron Pollard reaches Dubai with his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.