Join us

IPL 2020 MI vs CSK Latest News : नाणेफेकीला आलेल्या MS Dhoniनं घेतली रेफरींची फिरकी; विचारलं, स्लीप ठेवायची की नाही!

IPL 2020 MI vs CSK Latest News :

By स्वदेश घाणेकर | Updated: September 19, 2020 19:46 IST

Open in App

IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसच्या संकटात IPL 2020 होणार की नाही, याबाबत सर्वच संभ्रमात होते, परंतु आज अखेरीस तो दिवस उजाडला. महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून सर्वांना आनंद झाला. नाणेफेकीला आलेल्या धोनीनं यावेळी रेफरीची फिरकी घेतली. 437 दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर आलेल्या धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याचवेळी त्यानं रेफरीला स्लीप ठेवायची की नाही, हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारला. ( IPL 2020 Live Updates, Click here

MI vs CSK Live Score: रोहित शर्माचा पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार

 मुंबई इंडियन्सच्या संघात दोन खेळाडूंचे पदार्पण, सौरभ तिवारीचे पुनरागमन

नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीनं निर्णय सांगण्यापूर्वी दोन सेकंदाचा कालवधी घेतला. त्याबाबत मुरली विजयनं त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला,''सोशल डिस्टन्सिंगच्या नव्या नियमात स्लीप ठेवू शकतो की नाही, हे मला त्यांना विचारायचे होते. ( धोनी हसला). मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. रात्री येथे दव प्रभाव टाकू शकतात.''  ( IPL 2020 Live Updates, Click here)   

10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

जुलै 2019पासून महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) निवृत्तीची चर्चा सुरू होती अन् स्वातंत्र्य दिनी धोनीनं निवृत्तीची घोषणा केली.  भारतीय  धोनीनं  सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर तो 436 दिवसांनी मैदानावर परतला आहे.  ( IPL 2020 Live Updates, Click here

आयपीएलमध्येही धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. कर्णधार म्हणून IPLमध्ये 100 सामने जिंकणारा एकमेव कर्णधार, IPL इतिहासात सर्वाधिक 38 स्पम्पिंगचा विक्रम धोनीच्या नावावर आहेत.  IPLच्या सर्वाधिक 9 फायनल खेळणारा खेळाडू ( 8 वेळा CSKकडून, तर रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून एकवेळा फायनल खेळला), IPLमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 94 झेल व 38 स्पम्पिंग करणारा खेळाडू., यपीएलमध्येही डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक 2206 धावांचा विक्रम ,  IPLमध्ये 20व्या षटकात मिळून 500हून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू, इत्यादी. 

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स