Join us  

IPL 2020 MI vs CSK Latest News : रोहित शर्माची घेतलेली विकेट पीयूष चावलासाठी ठरली विक्रमी

IPL 2020 MI vs CSK Latest News : हरभजन सिंगचा विक्रम मोडला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 19, 2020 10:41 PM

Open in App

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. पहिल्या चार षटकांत सामना MIच्या पारड्यात होता, पण पाचव्या षटकात दोन्ही सलामीवीर परतले. त्यानंतर सौरभ तिवारीनं खिंड लढवली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी केली. पण, पुन्हा CSKनं सामन्यात कमबॅक केले आणि मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. या सामन्यात रोहित शर्माला बाद करणाऱ्या पीयूष चावलानं ( Piyush Chawla) ने एका विक्रमाला गवसणी घातली. चावलानं 4 षटकांत 21 धावांत 1 विकेट घेतली, पण ती विक्रमी ठरली. ( IPL 2020 Live Updates, Click here

फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या रोहितनं CSK गोलंदाज दीपक चहर याचं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून स्वागत केलं. इतक्या दिवसांनी बॅटवर हात साफ करण्याची संधी रोहित या सामन्यात सोडणार नाही, त्याची फटकेबाजी पाहून असेच वाटत होते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुर नेतृत्वानं सामन्यात रंगत आणली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. ( IPL 2020 Live Updates, Click here

मुंबई इंडियन्स इथे गमावली सामन्यावरील पकड; डू प्लेसिसचे झेल ठरले टर्निंग पॉईंट

पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचे ( MI) दोन्ही सलामीवीर 48 धावांत माघारी परतल्यानंतर CSK सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होते, पण, सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर उतरला. त्याने सुरुवातीला फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूने सौरभ तिवारी फटकेबाजी करत होता. ( IPL 2020 Live Updates, Click here

फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी

पण, 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf  du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला. त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या. MIच्या 15 षटकांत 5 बा 126 धावा झाल्या होत्या.  कृणाल पांड्या ( Krunal Pandya) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हे मोठी खेळी करतील अशी अपेक्षा होती. पण, चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही. जेम्स पॅटिन्सनही ( 11) लगेच बाद झाला. मुंबई इंडियन्सला ( MI) 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( 42/2) आणि दीपक चहर ( 32/2) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवून दिल्या. 

महेंद्रसिंग धोनीला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून पत्नी साक्षीची रोमँटिक पोस्ट

दीपक चहरची अनोखी 'हॅटट्रिक'; IPLमध्ये असा पराक्रम कुणाला जमला नाही

IPLच्या 12 पर्वात जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं

पीयूष चावलाचे विक्रम

  • पीयूष चावला ह्याने किंग्ज ईलेव्हन, कोलकाता नाईट रायडर्स आणि आता चेन्नई सुपर किंग्ज या संघांकडून खेळताना तिन्ही वेळा आपली पहिली विकेट  मुंबई इंडियन्सविरुध्दच घेतली आहे.
  • पीयूष चावला आयपीएलमधील सर्वात सफल गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी. हरभजनला टाकले मागे. रोहित शर्मा हा त्याचा 151 वा बळी ठरला. लसिथ मलिंगा ( 170 विकेट्स), अमित मिश्रा ( 157 विकेट्स), पीयूष चावला ( 151*), हरभजन सिंग ( 150 विकेट्स) आणि ड्वेन ब्राव्हो ( 147 विकेट्स).
टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स