Join us

IPL 2020 : राहुलच असेल मुंबई इंडियन्सचा मेन टार्गेट; शेन बाँडने सांगितली योजना  

K. L. Rahul : मुंबईची गोलंदाजी अत्यंत मजबूत असून त्यांच्यापुढे आव्हान आहे ते किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुल-मयांक अग्रवाल या फॉर्ममध्ये असलेल्या सलामी जोडीचे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 14:29 IST

Open in App

मुंबई - मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्ज ईलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) आज Indian Premier League (IPL 2020) मध्ये एकमेकांविरुद्ध भिडतील. दोन्ही संघांना आपली गाडी विजयी मार्गावर आणायची असल्याने या लढतीत अत्यंत अटीतटीचा खेळ रंगेल हे नक्की. मुंबईची गोलंदाजी अत्यंत मजबूत असून त्यांच्यापुढे आव्हान आहे ते किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुल-मयांक अग्रवाल या फॉर्ममध्ये असलेल्या सलामी जोडीचे. गेल्या काही सामन्यांत राहुलने सातत्याने मुंबईविरुद्ध धावा काढल्या आहेत. त्यामुळेच त्याला रोखणे हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल, असे सुतोवाच मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड (Shane Bond) याने दिले.पंजाबच्या आतापर्यंतच्या सामन्यात राहुलने सातत्याने धावा फटकावल्या आहेत. मयांकनेही त्याला दमदार साथ दिली. तसेच, सध्या आॅरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या दोन स्थानावरही राहुल आणि मयांक यांनीच कब्जा केला आहे. त्यामुळेच या दोघांना आणि त्यातही राहुलला रोखण्यावर मुंबईकरांचा भर असेल.पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाँडने सांगितले की, ‘राहुलने गेल्या काही सामन्यांत आमच्याविरुद्ध सातत्याने धावा केल्या असून तो शानदार खेळाडू आहे. आम्ही आमच्या गोलंदाजांसह एक बैठक घेणार असून आमच्याविरुद्ध सातत्याने चांगले खेळत असलेल्या फलंदाजांविरुद्ध चांगली रणनिती आखण्याचा प्रयत्न करु. राहुल अत्यंत चांगला फलंदाज असून तो मैदानात चौफेर फटकेबाजी करतो.’बाँड राहुलविषयी पुढे म्हणाला की, ‘मध्यल्या षटकांमध्ये राहुल काहीसा वेळ घेतो याचीही आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच त्यादरम्यान त्याच्यावर आणि इतर फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात आमच्याकडे चांगली संधी असेल. ज्या ठिकाणी फटके मारण्यास तो सक्षम आहे, तिथे आम्ही त्याला धावा काढण्यापासून रोखू. तो एक्ट्रा कव्हर आणि फाईन लेगला भरपूर धावा घेतो. राहुलला बाद करण्यासाठी विशेष रणनितीचा अवलंब करु.’ 

 

टॅग्स :लोकेश राहुलकिंग्स इलेव्हन पंजाबमुंबई इंडियन्सIPL 2020