Join us

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू परतला; राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का बसला

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 18:41 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. शिवाय मुंबई इंडियन्सनेही ट्रेंट बोल्टला आपलेसे केले आहे. आयपीएल 2020च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तत्पूर्वी ट्रेड ( अदलाबदली) करून संघ त्यांना हवा तो खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल करून घेत आहेत. आतापर्यंत दिल्लीनं सर्वाधिक खेळाडूंची अदलाबदल केली आहे. मुंबई इंडियन्स संघाने आणखी एका गोलंदाजाला आपल्या चमूत दाखल करून घेतले आहे. 

IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू; रोहितची टीम आणखी वेगानं मारा करणार

मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी बुधवारी न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. बोल्टनं 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2018 व 2019मध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानं 33 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.

गुरुवारी मुंबई इंडियन्सनं माजी खेळाडू धवल कुलकर्णीला आपल्या संघात दाखल करून घेतले. राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूला घेत मुंबईनं आपली गोलंदाजी अजून मजबूत केली आहे. धवलनं 2008 ते 2013 या कालावधीत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. मुंबईकडून 33 सामन्यांत त्यानं 36 विकेट्स घेतल्या आहेत. एकूण त्यानं 90 आयपीएल सामन्यांत 86 विकेट्स घेतल्या आहेत. 

आतापर्यंत यांची झाली अदलाबदली

  • मयांक मार्कंडे (1.4 कोटी) मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले
  • दिल्ली कॅपिटल्सचा शेर्फान रुथरफोर्ड ( 6.2 कोटी) मुंबई इंडियन्सकडून खेळणार
  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा आर अश्विन ( 7.6 कोटी) पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
  • दिल्ली कॅपिटल्सचा जगदीशा सुचिथ ( 20 लाख ) किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात
  • दिल्ल कॅपिटल्सचा ट्रेंट बोल्ट ( 2.2 कोटी) मुंबई इंडियन्सच्या संघात
  • राजस्थान रॉयल्सचा  कृष्णप्पा गौवथम ( 6.2 कोटी) किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार
  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा अंकित रजपूत ( 3 कोटी) राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात 
टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स