Join us

IPL 2019 : युवराज मुंबई इंडियन्सचा सदस्य होताच रणवीर सिंगने दिली ही प्रतिक्रिया!

मुंबई इंडियन्सने सिक्सर किंग युवराज सिंगला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 13:01 IST

Open in App
ठळक मुद्देबॉलिवुड स्टार रणवीर सिंगची प्रतिक्रिया व्हायरलयुवराज सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार म्हणून केलं ट्विटयुवराज मूळ एक कोटीच्या किमतीत मुंबईच्या ताफ्यात

मुंबई, आयपीएल लिलाव 2019: इंडियन प्रीमिअर लिगच्या 2019च्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्सने सिक्सर किंग युवराज सिंगला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर चाहते प्रचंड खूश झाले. या चाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचाही समावेश आहे आणि त्याने त्याचा आनंद ट्विटरवरून जाहीर केला. 

भारताच्या 2011 च्या विश्वचषक विजयात युवराजचा सिंहाचा वाटा होता. जयपूर येथे झालेल्या लिलावातील पहिल्या फेरीत युवराजसाठी एकाही संघाने उत्सुकता दाखवली नाही. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने त्याला मूळ किमतीत सदस्य करून घेतले. मुंबई इंडियन्सने एक कोटीच्या मूळ किमतीत युवराजला आपल्या संघाचा सदस्य बनवले आणि ट्विट करूनही त्यांनी युवराजचे स्वागत केले. त्यानंतर रणवीरने तोच ट्विट रिट्विट करून 'OUUUH YIEEEAH!!!!!' अशी प्रतिक्रीया दिली. रणवीरचा हा ट्विट चांगलाच व्हायरल होत आहे. 2015 मध्ये युवराजला सर्वाधिक 16 कोटीत दिल्ली डेअरडेव्हिल्सने संघात घेतले आणि आजही आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूंत तो अव्वल स्थानावर आहे. मात्र, 2018 मध्ये युवीला केवळ एक कोटी रुपये मिळाले. 2015 च्या तुलनेत त्याचा बाजारभाव 94 टक्क्यांनी कमी झाला आहे.  

 

टॅग्स :युवराज सिंगरणवीर सिंगइंडियन प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्स