Join us

IPL 2019, KXIPvMI : सख्खे मित्र, पक्के वैरी...

एकाच संघातील खेळाडू एकमेकांसमोर उभे ठकलेलेही पाहायला मिळातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 17:02 IST

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : आयपीएलमध्ये क्रिकेट विश्व एका छताखाली येते, असे म्हटले जाते. एका संघात विविध देशांचे खेळाडू पाहायला मिळतात. पण काही वेळेला एकाच संघातील खेळाडू एकमेकांसमोर उभे ठकलेलेही पाहायला मिळातात, पण असे असले तरी त्यांच्यातील मैत्री मात्र कायम राहते. याबाबतचे एक ताजे उदाहरण आज पाहायला मिळाले.

भारताच्या गेल्या काही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी खांद्याला खांदा लावून गोलंदाजी केली. प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चकवले. पण आता हेच दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले गेले आहेत.

आज मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये सामना रंगत आहे. बुमरा हा मुंबईचा मुख्य शिलेदार आहे, तर शमी हा पंजाबचे मुख्य अस्त्र आहे. त्यामुळे हे दोघे आज एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. पण सामना सुरु होण्यापूर्वी मात्र त्यांच्यातील मैत्री पाहायला मिळाली. सराव झाल्यावर या दोघांची भेट झाली. या भेटीमध्ये बऱ्याच गोष्टींवर चर्चा आणि काहीशी मस्करीही झाली.

टॅग्स :जसप्रित बुमराहमोहम्मद शामीमुंबई इंडियन्सकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019