प्रीती पुन्हा संतापली; यावेळी मध्य प्रदेशमधील मंत्र्याच्या नावाने शंख

पंजाब संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण ताजे असतानाच प्रीती झिंटा आणखी एका वादग्रस्त प्रकरणामुळं चर्चेत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 15:53 IST2018-05-17T15:52:29+5:302018-05-17T15:53:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2018 : preity zinta got angry over aminister during kxip vs mumbai indians match | प्रीती पुन्हा संतापली; यावेळी मध्य प्रदेशमधील मंत्र्याच्या नावाने शंख

प्रीती पुन्हा संतापली; यावेळी मध्य प्रदेशमधील मंत्र्याच्या नावाने शंख

नवी दिल्ली - पंजाब संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण ताजे असतानाच प्रीती झिंटा आणखी एका वादग्रस्त प्रकरणामुळं चर्चेत आली आहे. पंजाब संघाचे यावेळी होम ग्राऊंडचे सामने दोन मैदानावर होत आहेत. पहिल्या टप्यात मोहालीमध्ये सामने पार पडल्यानंतर आत इंदौरमध्ये सामने होत आहेत. मुंबईच्या विरोधातील सामन्यापूर्वी एक घटना घडली त्यावर प्रीती झिंटा पत्रकार परिषेदत भडकली. 

मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्यांना सामन्याचे व्हीआयपी तिकीट मिळाले नाही. त्यामुळं रागात त्या मंत्र्याने मैदानाकडे जाणारा रस्ता बंद केला. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील जाग्यावर पार्किंगही थांबवली. या सर्व प्रकरणामुळं प्रीती झिंटाला राग अनावर आला. पत्रकार परिषद घेत प्रीतीने मध्य प्रदेश सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी आधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंजाब संघ्याचे सीईओ सीईओ सतीश मेनन यांनी सांगितले की प्रत्येक सामन्याला सरकारी आधिकारी 60 ते 70 लाख रुपयापर्यंतची तिकीटे मागतात. 

मोहालीमध्ये कमीतकमी 500 रुपये असणारे तिकीट इंदौरमध्ये 900 रुपये असल्यामुळं चाहचे नाराज आहेत. तर पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे प्रशासन नाराज आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी तिकीट न मिळाल्यामुळं मंत्री नाराज आहेत. 
दरम्यान, काल मुंबई विरोधात झालेल्या सामन्यात पंजाबला तीन धावांनी निसटक्या पराभवचा सामना करावा लागला. राहुलने 94 धावांची वादळी खेळी केली. 

Web Title: IPL 2018 : preity zinta got angry over aminister during kxip vs mumbai indians match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.