Join us

सेहवाग अन् सचिनकडून 'दादा'ला मजेशीर शुभेच्छा, पाहा काय लिहलयं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 17:30 IST

Open in App

मुंबई- भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या वीरेंद्र सेहवानेही सौरव गांगुलीला मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवागने ट्विटरवरुन चार फोटो शेअर केले असून त्यामध्ये गांगुलीच्या 4 स्टेप्सचा उल्लेख केला आहे. सौरवची फलंदाजी, गोलंदाजी आणि विजयाच्या सेलिब्रेशनची पद्धत व्यक्त केली आहे. तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही खास बंगाली भाषेत शुभेच्छा देत 'दादागिरी' करत राहा, असे ट्विट केले आहे.

आपल्या मजेशीर ट्टिटमुळे सेहवाग नेहमीच माध्यमांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतो. सेहवागचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होते. तसेच त्याच्या ट्विटरवर चर्चाही केली जाते. कारण, एखादा गंभीर विषय किंवा गंमतशीर ट्विट त्याच्या अकाऊंटवर नेहमीच पाहायला मिळते. सोबतच, क्रिकेटमधील आपल्या सहकाऱ्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छाही द्यायला सेहवाग विसरत नाही. शनिवारी धोनीला खास शुभेच्छा दिल्यानंतर आज सेहवाने सौरव गांगुलीला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना मजेशीर ट्विट केले आहे. त्यामध्ये खालील 4 बाबींचा उल्लेख केला आहे. 

1 - उठा, आपल्या डोळ्यांना दोनवेळेस मिचकवा आणि धावपट्टीवरुन पुढे येत नाचा. 2 - गोलंदाजांची धुलाई करा, एवढचं नाही तर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचीही ( कुठल्याही हिंसेच्या उद्देशाने नव्हे)3 - केवळ चेंडूलाच स्विंग करु नका तर तुमच्या केसांनाही स्विंग करा. 4 - विजयाचे सेलिब्रेशन असे करा की कुणीही तुमच्याकडे पाहात नाही. #Happy Birthday Dada

सेहवाने अशाप्रकारे प्रत्येक फोटोला कॅप्शन देत गांगुलीला मजेशीर आठवणींसह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या 4 स्टेपमधील पहिल्या वाक्यातून गांगुलीच्या डोळे मिचकविण्याच्या सवयीवर सेहवागने प्रकाश टाकला. तर दुसऱ्या स्टेपमध्ये गांगुलीने मारलेला चेंडू मैदानातील एका प्रेक्षकाला लागला होता. त्यावेळी त्या प्रेक्षकाला मोठी जखमही झाली होती, त्याचा संदर्भ दिला आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये गोलंदाजी करताना गांगुलीचे हवेत उडणारे केस सेहवागने टिपले आहेत. तर चौथ्या स्टेपमध्ये लॉर्ड मैदानावर शर्ट काढून गांगुलीने साजऱ्या केलेल्या विजयाची आठवण सेहवागने करुन दिली आहे.

सचिनकडूनही सौरवला खास बंगाली भाषेत 'दादागिरी' करण्यासाठी शुभेच्छा...

व्हीव्हीएस. लक्ष्मणकडूनही सौरवला शुभेच्छा...

मोहम्मद कैफनेही लॉर्डवरील विजयाचीआठवण करुन देत गांगुलीला शुभेच्छा दिल्या...

टॅग्स :सौरभ गांगुलीसचिन तेंडूलकरविरेंद्र सेहवागक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ