Join us

शुभमनला दुखापत, पहिल्या लढतीमध्ये सहभागी नाहीच

सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘शुभमनला शिन स्ट्रेस फॅक्चर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 05:25 IST

Open in App
ठळक मुद्देसूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘शुभमनला शिन स्ट्रेस फॅक्चर आहे.

नवी दिल्ली : भारताचा सलामवीर शुभमन गिलच्या पायाला (गुडघ्याच्या खालच्या भागात) गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला किमान दोन महिन्यांपर्यंत क्रिकेटपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. गिल इंग्लंडविरुद्ध नॉटिंघममध्ये ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीमध्ये सहभागी होणार नसल्याचे निश्चित आहे.

सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘शुभमनला शिन स्ट्रेस फॅक्चर आहे. त्यामुळे तो किमान दोन महिने बाहेर राहील. त्यामुळे तो ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत सहभागी होऊ शकणार नाही.  

विश्रांती व रिहॅबिलिटेशनची गरज’ ‘शिनचे स्ट्रेस फ्रॅक्चर फार गंभीर नसते; पण त्यासाठी विश्रांती व रिहॅबिलिटेशनची गरज असते. जर शिनचे फ्रॅक्चर असेल, तर त्यातून सावरण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो; पण शिन स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणून सावरण्यासाठी सर्वसाधारणपणे ८ ते १० आठवड्यांचा कालावधी लागतो.

टॅग्स :शुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ