India Women vs England Women ODI : पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आहे. दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा (८) माघरी परतल्यानंतर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटीया यांनी भारताचा डाव सावरला आहे. भारताने १० षटकांत १ बाद ६० धावा केल्या आणि यात मानधनाने विश्वविक्रमी पराक्रम केला. मानधनाने या सामन्यात २५ धावा करताना वन डे क्रिकेटमध्ये ४३च्या सरासरीने ३००० धावांचा टप्पाही पार केला.
![]()
भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये ३०००+ धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये मानधनाने तिसरे स्थान पटकावले आहे. माजी कर्णधार मिताली राजच्या नावावर ७८०५ धावा आहेत, तर सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर ३१७५* धावा आहेत. महिला क्रिकेटमध्ये वन डेत सर्वात जलद ३००० धावा करणाऱ्या खेळाडूंत मानधनाने तिसरे स्थान पटकावले. तिने ७६ सामन्यांत हा टप्पा ओलांडला. मितालीने ८८ डावांत हा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाची कॅरेन रोल्टन व दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क ( ६२) व मेग लॅनिंग ( ६४) या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत ३००० धावा करणाऱ्या पुरूष क्रिकेटपटूंमध्ये हाशिम आमला ( ५९ सामने) अव्वल स्थानी आहे.
विराट कोहली ( ७८ सामने),
जो रूट ( ७७), केन विलियम्सन ( ७८), जॉनी बेअरस्टो ( ७९) हे बरेच मागे आहेत. इनिंग्जच्या बाततीत मानधनाने शिखर धवन व विराट यांना टक्कर दिली आहे. धवनने ७२ इनिंग्जमध्ये, तर विराटने ७५ इनिंग्जमध्ये वन डेत ३००० + धावा केल्या. पण, सामन्यांच्या बाततीत मानधना भारतीयांमध्ये अव्वल ठरली.