INDW vs AUSW: भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती संघाबाहेर

indw vs ausw 1st odI: आज भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला वन डे सामना खेळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 01:59 PM2023-12-28T13:59:53+5:302023-12-28T14:02:37+5:30

whatsapp join usJoin us
indw vs ausw Smriti Mandhana is unwell and therefore wasn't available for the 1st ODI today against australia | INDW vs AUSW: भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती संघाबाहेर

INDW vs AUSW: भारताची प्रथम फलंदाजी! पण टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्मृती संघाबाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

indw vs ausw 1st odI । मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील तिन्ही सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जात आहेत. आज सलामीचा सामना असून, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आज आजारी असल्याने आज पहिल्या वन डेसाठी उपलब्ध नाही. आजच्या सामन्यातून साइका इशाक भारतीय संघात पदार्पण करत आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, अनजोत कौर, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, साइका इशाक, रेणुका सिंग. 

दरम्यान, अलीकडेच टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत केले. त्यामुळे साहजिकच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला. पण, कांगारूंनी अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आपला विजयरथ कायम ठेवण्याचे आव्हान भारतासमोर असेल. वन डे मालिकेनंतर भारतीय संघ नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. 

Web Title: indw vs ausw Smriti Mandhana is unwell and therefore wasn't available for the 1st ODI today against australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.