चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात

बीसीसीआयच्या सिलेक्टर्सनी दुबे फुल फॉर्ममध्ये आहे हे पाहून त्याची संघात निवड केली. परंतु त्यानंतर त्याने असे काही खेळण्यास सुरुवात केली की बॅटला बॉल लागणे कठीण होऊन बसले आहे.

आयसीसी टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होणार होती. आयपीएल २०२४ सुरु झाली होती. प्रत्येक खेळाडूला आपली निवड व्हावी म्हणून झटताना पाहिले गेले होते.

परंतु जशी निवड झाली तशी चेन्नईच्या एका खेळाडूने आपल्या खराब खेळीतून संघच गोत्यात आणला. तसाच प्रकार टीम इंडियासोबतही होईल का अशी धाकधूक चाहत्यांमध्ये लागून राहिली आहे.

हा खेळाडू आहे शिवम दुबे. बीसीसीआयच्या सिलेक्टर्सनी दुबे फुल फॉर्ममध्ये आहे हे पाहून त्याची संघात निवड केली. परंतु त्यानंतर त्याने असे काही खेळण्यास सुरुवात केली की बॅटला बॉल लागणे कठीण होऊन बसले आहे.

दुबे आता क्रीझवर जोरदार फटके खेळण्यासाठी संघर्ष करत आहे. हे भारतीय संघासाठी चांगले संकेत नाहीत.

टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी शिवम दुबेने १७२ च्या स्ट्राईक रेटने ५८ च्या सरासरीने रन्स काढले होते. परंतु निवड झाल्यावर दुबेने ९.२ च्या सरासरीने रन्स काढले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ११२ राहिला आहे.

कालच्या चेन्नईसाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात दुबेने १५ बॉलमध्ये अवघे सात रन्स काढले आहेत. एवढे चेंडू खेळुनही दुबे चाचपडत होता. दुबेने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतक ठोकली असून १४ मॅचमध्ये त्याने ३९६ रन्स काढले आहेत.