INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा

सचिनबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 14:14 IST2020-02-09T14:13:17+5:302020-02-09T14:14:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
INDVBAN, U19CWCFinal: Sachin Tendulkar best wishes to u-19 Indian team | INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा

INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा संघ बांगलादेशबरोबर दोन हात करत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दहा विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आज भारतीय संघ विश्वचषक पटकावण्यासाठी बांगलादेशबरोबर दोन हात करत आहे.

विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी सचिनने भारतीय संघाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाला शुभेच्छा देताना सचिन म्हणाला की, " युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारतीय संघाला माझ्याकडून शुभेच्छा. भारतीय संघाने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यातही तुम्ही चांगली कामगिरी करा आणि विश्वचषक जिंका."

Web Title: INDVBAN, U19CWCFinal: Sachin Tendulkar best wishes to u-19 Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.