Join us

ICC Women's T20 World Cup, Semi-Final: देवासमोर कोण जिंकू शकतं? वीरूच्या भारतीय महिला संघाला हटके शुभेच्छा

ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी) आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 12:02 IST

Open in App

ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी) आली आहे. सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे सामना रद्द करावा लागला.  त्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. भारतानं अ गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि त्याच जोरावर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला. भारतीय संघाच्या अंतिम प्रवेशानंतर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं मजेशील ट्विट केलं. 

सेहवागनं लिहीले की,''उपांत्य फेरीचा सामना झाला असता, तर पाहायला आवडले असते, परंतु देवासमोर कोण जिंकू शकतं? मेहनतीचं फळ मिळतं. अ गटातील सर्व सामने जिंकल्याचा टीम इंडियाला फायदा झाला. त्यांचे खूप खूप अभिनंदन.'' 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकविरेंद्र सेहवागविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतइंग्लंड