Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताची विजयी घोडदौड कायम; न्यूझीलंडवर मात', सुपर सिक्स' फेरीत प्रवेश

U19T20 Cricket World Cup: १९ वर्षांखालील आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय युवा संघाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवत न्यूझीलंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने गटफेरीत अजिंक्य राहून 'सुपर सिक्स' फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:49 IST

Open in App

बुलावायो - १९ वर्षांखालील आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय युवा संघाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवत न्यूझीलंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने गटफेरीत अजिंक्य राहून 'सुपर सिक्स' फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.सामन्याचा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज आर. एस. अंबरीशचा भेदक मारा आणि कर्णधार आयुष म्हात्रेची आक्रमक अर्धशतकी खेळी हे भारताच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय भारतीय कर्णधाराने सार्थ ठरवला. पावसामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आला होता.

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. आर. एस. अंबरीशने ८ षटकांत २९ धावा देत ४ महत्त्वपूर्ण बळी टिपले, तर हेनील पटेलने त्याला सुरेख साथ देत ३ गडी बाद केले. न्यूझीलंडकडून फक्त कॅलम सॅमसन (३७) थोडा प्रतिकार करू शकला, परंतु इतर फलंदाजांच्या अपयशामुळे न्यूझीलंडचा डाव ३६.२ षटकांत १३५ धावांत आटोपला.डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर ३७ षटकांत १३० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. भारताची सुरुवात काहीशी खराब झाली, सलामीवीर ॲरॉन जॉर्ज स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. आयुषने अवघ्या २७ चेंडूत ५३ धावांची तुफानी खेळी केली, तर वैभवने २३ चेंडूत ४० धावा कुटल्या. अखेरीस विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी  यांनी अवघ्या १३.३ षटकांत भारताला विजयापर्यंत पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक न्यूझीलंड : ३६.२ षटकांत सर्वबाद १३५ धावा. (कॅलम सॅमसन ३७, ल्युक वॉटसन २०) गोलंदाजी : आर. एस. अंबरीश ४/२९, हेनील पटेल ३/२४. भारत : १३.३ षटकांत ३ बाद १३० धावा (डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेले लक्ष्य) (आयुष म्हात्रे ५३, वैभव सूर्यवंशी ४०) गोलंदाजी : लॅन्चलन स्टॅकपोल १/१७.सामनावीर : आर. एस. अंबरीश.

English
हिंदी सारांश
Web Title : India U-19 Clinches Victory Over New Zealand, Enters Super Six

Web Summary : India U-19 team defeated New Zealand by 7 wickets, securing a spot in the Super Six stage of the ICC U-19 World Cup. Ambareesh's bowling and Mhatre's fifty led the charge.
टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ