Women's T20 World Cup 2023: महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर, शेफाली वर्मा करणार नेतृत्व

India's Under-19 team: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून शेफाली वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:59 PM2022-12-05T14:59:37+5:302022-12-05T15:01:40+5:30

whatsapp join usJoin us
India's Under-19 team announced for Women's T20 World Cup 2023, Shefali Verma will be the captain  | Women's T20 World Cup 2023: महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर, शेफाली वर्मा करणार नेतृत्व

Women's T20 World Cup 2023: महिला ट्वेंटी -20 विश्वचषक 2023 साठी भारताचा अंडर-19 संघ जाहीर, शेफाली वर्मा करणार नेतृत्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. यासह दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी देखील भारतीय संघ जाहीर झाला आहे. ICC अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकाबद्दल भाष्य करायचे झाले तर, भारताला दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि स्कॉटलंडसह गट ड मध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील, जिथे संघांना सहा जणांच्या दोन गटात ठेवण्यात येईल.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील, जे 27 जानेवारी रोजी पॉचेफस्ट्रूम येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे खेळले जातील. या विश्वचषकाचा अंतिम सामना या मैदानावर 29 जानेवारीला होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी 19 वर्षाखालील भारतीय संघ - 
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी , पार्शवी चोप्रा, तीता साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री. 

19 वर्षाखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ -
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, तीता साधू, फलक नाझ, शबनम एमडी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: India's Under-19 team announced for Women's T20 World Cup 2023, Shefali Verma will be the captain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.