Join us  

भारताच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांविरुद्धच्या कसोटी सामन्यात झालेली फिक्सिंग? ICCनं दिला महत्त्वाचा निर्णय

आंतरराष्ट्रीय वेबसाईट अल जजीरा ( Al Jazeera) यांनी एक डॉक्यूमेंट्री सादर केली होती आणि त्यात मॅच फिक्सिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याचा दावा केला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:12 AM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांच्या फिक्सिंगच्या आरोपांचा तपास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) पूर्ण झाला असून त्यांनी क्लीन चिट दिली आहे. आंतरराष्ट्रीय वेबसाईट अल जजीरा ( Al Jazeera) यांनी एक डॉक्यूमेंट्री सादर केली होती आणि त्यात मॅच फिक्सिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याचा दावा केला गेला. २०१८मध्ये आलेल्या या ड्रॉक्युमेंट्रीनं क्रिकेट वर्तुळात खळबळ माजवली होती. यात भारतीय संघानं इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध खेळलेलेल्या एक-एक कसोटी सामना फिक्स असल्याचा दावा केला गेला होता. आता तीन वर्षांनंतर आयसीसीनं संपूर्ण तपास करून हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. या डॉक्युमेंट्रीत ज्या पाच सट्टेबाजांचे नाव होते, त्यांनाही पुराव्या अभावी आयसीसीनं क्लीन चिट दिली. Video : नको त्या जागी आग लावण्याचा स्टंट पडला महागात, सैरावैरा पळू लागला कुस्तीपटू

२०१८मध्ये अल जजीरानं Cricket’s Match Fixers ही ड्रॉक्युमेंट्री आणली होती आणि यात अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या फिक्सिंगचा दावा केला गेला होता. यात सट्टेबाजांनी हाही दावा केला होता की, दोन वर्षांत टीम इंडियानं खेळलेल्या दोन मोठ्या संघांविरुद्धच्या कसोटी सामने फिक्स केले गेले होते. २०१६मध्ये इंग्लंडविरुद्धची चेन्नई कसोटी आणि २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची रांची कसोटी या सामन्यांचा उल्लेख केला गेला. इंग्लंडविरुद्धचा सामना टीम इंडियानं जिंकला होता, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ड्रॉ राहिला होता. शिवाय २०११ पासून जवळपास १५ सामने फिक्स केल्याचा दावाही केला गेला.  

आयसीसी मागील अनेक वर्षांपासून क्रिकेटमधील भ्रष्टाचार व फिक्सिंग रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना यशही मिळालं आहे. अशात अल जजीराच्या डॉक्युमेंट्रीनं खळबळ माजवली होती. आयसीसीनं सोमवारी जाहीर केलेल्या निवेदनात हे सर्व दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. याचा तपास करण्यासाठी चार तज्ज्ञांची स्वतंत्र  समिती स्थापन केली गेली होती. या डॉक्युमेंट्रीत पाच जणांवर आरोप ठेवण्यात आले होते आणि त्यांना पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमॅच फिक्सिंगआयसीसीभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया