Join us

India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल

India vs South Africa T20I Series : आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 19:11 IST

Open in App

India vs South Africa T20I Series : आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत आफ्रिकेचा सामना करणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. आयपीएल २०२२त आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) त्याची निवड करण्यास भाग पाडले. 

चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज 

कुलदीप यादव, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक यांनीही आयपीएल २०२२तील कामगिरीच्या जोरावर संघात स्थान पटकावले. पण, बीसीसीआयच्या या निवडीवरून नेटिझन्स खवळले आहेत. ऋतुराज गायकवाड, इशान किशन, वेंकटेश अय्यर या फ्लॉफ ठरलेल्या खेळाडूंना संधी दिली गेली, तर राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi), संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांच्यावर अन्याय झाल्याची भावना नेटिझन्स व्यक्त करत आहेत. राहुलने १३ सामन्यांत १६१.७२च्या स्ट्राईक रेटने ३९३ धावा केल्या आहेत, संजूनेही १४ सामन्यांत १४७.२४च्या स्ट्राईक रेटने ३७४ धावा केल्या आहेत. शिखर १३ सामन्यांत ४२१ धावा करून आयपीएल २०२२त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत सहाव्या क्रमांकावर आहे.  

भारताचा संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक   नेटिझन्सनी विचारलाय जाब...

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशिखर धवनसंजू सॅमसनबीसीसीआय
Open in App