India’s Squad For Rising Star Asia Cup Announced : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) आशिया कप रायझिंग स्टार्स टी-२० स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या ताफ्यात असलेल्या जितेश शर्माकडे भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जितेश शर्माला संजू सॅमसनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. या दौऱ्यावरुन परतल्यार तो कतार येथील दोहा येथे रंगणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीलाही मिळाली टीम इंडियात संधी
आशिया कप रायझिंग स्टार्स टी-२० स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय 'अ' संघात १४ वर्षीय युवा बॅटर वैभव सूर्यंवशी यालाही संघात संधी देण्यात आली आहे. भारतीय 'अ' संघाकडून युवा बॅटरसाठी ही पहिली मोठी स्पर्धा असेल. आयपीएलनंतर वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात धमाकेदा कामगिरी करून दाखवली आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये मोठा धमाका करण्यासाठी माहिर असलेला वैभव या दौऱ्यात प्रियांश आर्य याच्या साथीनं डावाची सुरुवात करताना पाहायला मिळू शकते. १४ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत वेस्ट एंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथी ही स्पर्धा पार पडणार आहे.
आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल
या स्पर्धेत पुन्हा पाहायला मिळणार भारत-पाक महामुकाबला
आशिया कप २०२५ स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने तीन वेळा पाकस्तानचा पराभूत केले होते. फायनलमध्ये पाकला पराभूत करूनच टीम इंडियाने दुबईत आशिया कप स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यानंतर महिला वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आता जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पुन्हा पाक विरुद्ध भिडणार असून निकाल आधी लागला तसाच पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धत १६ नोव्हेंबरला भारत-पाक यांच्यातील लढत नियोजित आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्स टी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघ
प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर (उप-कर्णधार), सूर्यांश शेडगे, जितेश शर्मा (कर्णधार), रमनदीप सिंह, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, यश ठाकुर, गुरजापनीत सिंह, विजय कुमार वैश्य, युद्धवीर सिंह, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सुयश शर्मा
राखीव खेळाडू - गुरनूर बराड, कुमार कुशाग्र, तनुश कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद.
आशिया कप रायझिंग स्टार्स टी-२० स्पर्धेतील सामन्याचे वेळापत्रक
- १४ नोव्हेंबर : ओमान विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध यूएई
- १५ नोव्हेंवर : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग आणि अफगानिस्तान विरुद्ध श्रीलंका
- १६ नोव्हेंबर : ओमान विरुद्ध यूएई; भारत विरुद्ध पाकिस्तान
- १७ नोव्हेंबर : हाँगकाँग विरुद्ध श्रीलंका आणि अफगानिस्तान विरुद्ध बांगलादेश
- १८ नोव्हेंबर : पाकिस्तान विरुद्ध यूएई आणि भारत विरुद्ध ओमान
- १९ नोव्हेंबर : अफगानिस्तान विरुद्ध हाँगकाँग आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
- २१ नोव्हेंबर - सेमीफायनल: A1 विरुद्ध B2 आणि B1 विरुद्ध A2
- २३ नोव्हेंबर - फायनल