Join us

IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा सुवर्णक्षण video

 ipl opening ceremony 2023 : आजपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 18:50 IST

Open in App

अहमदाबाद : आजपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात होत आहे. यंदाची आयपीएलची स्पर्धा इतर हंगामाच्या तुलनेत फारच वेगळी असणार आहे, कारण या हंगामात १२ खेळाडूंसह कर्णधार आपले नशीब आजमावणार आहे. कारण इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय कर्णधार आता वाईड बॉल आणि कमरेच्या वर चेंडू असल्यास नो बॉलसाठी चौथ्या अम्पायरची मदत घेण्यासाठी रिव्ह्यू घेऊ शकतो. आज या स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. गतविजेता हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्सचा संघ धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध सलामीचा सामना खेळत आहे.

दरम्यान, आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यापूर्वी भारताचा प्रसिद्ध गायक अरजित सिंगने गाण्याद्वारे चाहत्यांचा उत्साह वाढवला.

तसेच अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंधाना यांनी नृत्याद्वारे आयपीएलच्या सौंदर्यात आणखी भर घातली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३नरेंद्र मोदी स्टेडियमअरिजीत सिंहतमन्ना भाटियारश्मिका मंदाना
Open in App