Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC 2026, Player Of The Series:...अन् संजू विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅटरपेक्षाही ठरला भारी

विराटचा ऑलटाइम विक्रम मोडणारा साहिबजादा फरहानही पडला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 23:55 IST

Open in App

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात संजू सॅमसन याने मोलाचा वाटा उचलला. ज्या संजूला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाकावर बसवण्यात आले त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियात एन्ट्री झाली. पुन्हा त्याच्यावर सलामीवीराची जबाबदारी सोपवण्यात आली अन् त्याने या संधीचं सोनं करुन दाखवलं. फक्त पाच सामन्यात धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्याने यंदाच्या हंगामातील मालिकावीराचा पुरस्कार पटकवला आहे.

विराटचा ऑलटाइम विक्रम मोडणारा साहिबजादा फरहानही पडला मागे

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान याने दोन शतकाच्या मदतीने सर्वाधिक धावा करत विराट कोहलीचा ऑल टाइम विक्रम मोडीत काढला होता. ६ सामन्यातील ६ डावात त्याने ३८३ धावा केल्या. विश्वविक्रमी कामगिरीसह तो प्लेयर ऑफ द सीरिजच्या शर्यतीत आघाडीवर होता. पण संजू सॅमसन याने सलग तीन अर्धशतकाच्या जोरावर त्याला मागे टाकले. 

भारत बनला चैंपियन | IND v NZ T20 WC Final Match Highlights 

संजूनं मोक्याच्या संधी मिळालेल्या संधीच सोनं करुन दाखवलं 

संजू सॅमसन याने वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध मोठी आणि सामन्याला कलाटणी देणाऱ्या अर्धशतकी खेळीसह यंदाच्या हंगामात लेट एन्ट्री मारून थेट मालिकावीराच्या शर्यतीत पहिला नंबर काढला. ५ सामन्यातील ५ डावात सर्वोच्च ८०.२५ च्या सरासरीसह ३२१ धावा केल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : T20 WC 2026: Samson surpasses Pakistani batter to win Player of Series

Web Summary : In the T20 World Cup final, India defeated New Zealand. Sanju Samson's late entry and consistent performance, including three half-centuries, earned him the Player of the Series award. He surpassed Pakistani opener Sahibzada Farhan, despite Farhan's record-breaking run.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघसंजू सॅमसन