भारतीय महिला संघाच्या 'या' खेळाडूला ट्रेनरनेच केले प्रपोज, जाणून घ्या काय दिले उत्तर

भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 20:05 IST2022-09-11T20:05:25+5:302022-09-11T20:05:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian women's team player Veda Krishnamurthy has accepted Arjun Hoya's marriage proposal | भारतीय महिला संघाच्या 'या' खेळाडूला ट्रेनरनेच केले प्रपोज, जाणून घ्या काय दिले उत्तर

भारतीय महिला संघाच्या 'या' खेळाडूला ट्रेनरनेच केले प्रपोज, जाणून घ्या काय दिले उत्तर

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाची घातक फलंदाज वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) सध्या संघाबाहेर असून ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रविवारी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड (Veda Krishnamurthy Boyfriend) वेदाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. वेदाचा होणारा पती अर्जुन होयसाला हा एक प्रोफेशनल ट्रेनर आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियन वेटलिफ्टिंग संघाचा कंडिशनिंग सहयोगी प्रशिक्षक आहे.

वेदाने स्वीकारला लग्नाचा प्रस्ताव

अर्जुनने रविवारी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो वेदा कृष्णमूर्तीला प्रपोज करताना दिसत असून त्याच्या हातामध्ये रिंग देखील पाहायला मिळत आहे. सध्या वेदा भारतीय संघातून बाहेर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील संघात देखील तिची निवड झाली नव्हती. मात्र भारताच्या एकदिवसीय संघाचा ती महत्त्वाचा चेहरा आहे, भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना तीन टी-२० आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातही वेदा संघासोबत नाही. तिने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.

लक्षणीय बाब म्हणजे क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती मागील मोठ्या कालावधीपासून अर्जुन होयसाला डेट करत आहे. त्यामुळे अर्जुन होयसालाने एका सुंदर ठिकाणी प्रपोज करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. खरं तर अर्जुनने वेदाला लग्नासाठी प्रपोज केले यानंतर वेदानेही त्याला होकार दिला. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली, जी अर्जुनने शेअर केली. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "आणि ती म्हणाली, हो". वेदा कृष्णमूर्तीने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत ४८ एकदिवसीय आणि ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच तिच्या नावावर एकदिवसीयमध्ये ८२९ आणि टी-२० मध्ये ८७५ धावांची नोंद आहे. 


 

Web Title: Indian women's team player Veda Krishnamurthy has accepted Arjun Hoya's marriage proposal