Join us

भारतीय महिलांचा लंकेविरुद्ध धावगती सुधारण्यावर भर; भक्कम फलंदाजीसह मोठ्या विजयाचे आव्हान

श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय नोंदवून धावगती सुधारण्यावर भर देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 10:10 IST

Open in App

दुबई : फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीमुळे सुरुवातीच्या दोन सामन्यांत संमिश्र निकाल आल्यानंतर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषकाच्या 'अ' गटातील लढतीत बुधवारी श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय नोंदवून धावगती सुधारण्यावर भर देणार आहे.

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव पत्करल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध १०६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी १८.५ षटके खर्ची घातले. खराब फलंदाजी ही मुख्य समस्या आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना दोन्ही सामन्यांत दमदार सुरुवात करू शकल्या नाहीत. शेफालीने दोन आणि ३२, तर स्मृतीने १२ आणि सात धावा केल्या. मधल्या फळीवरील दडपण कमी करण्यासाठी या दोघींना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हरमनप्रीत कौर पाकविरुद्ध फलंदाजी करताना जखमी झाली होती. मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत हरमनने फलंदाजीत १६ वरून १२ स्थानी झेप घेतली आहे.

सामना : सायंकाळी ७.३० पासून, प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस, लाइव्ह स्ट्रिमिंग : डिइनी हॉटस्टार

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट