Join us  

भारतीय संघ जानेवारी महिन्यात खेळणार तब्बल १० सामने, जाणून घ्या वेळापत्रक

हे दहा सामने नेमके कधी खेळवले जातील, याची उत्सुकता तुम्हाला असेल. त्यामुळे या १० सामन्यांचे वेळापत्रक तुम्ही जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 4:28 PM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिका संपली आहे. भारताने या दोन्ही मालिकेत विजय मिळवला. आता जानेवारी महिन्यात तर भारतीय संघ १० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. हे दहा सामने नेमके कधी खेळवले जातील, याची उत्सुकता तुम्हाला असेल. त्यामुळे या १० सामन्यांचे वेळापत्रक तुम्ही जाणून घ्या...

जानेवारीमध्ये भारत पहिल्यांदा श्रीलंकेबरोबर तीन ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात जानेवारीमध्ये चार ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत.

टीम इंडियाचे जानेवरी 2020 मधील वेळापत्रक

5 जानेवरी, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी20 सामना(गुवाहाटी)

7 जानेवरी, भारत  विरुद्ध  श्रीलंका, दूसरा टी20 सामना(इंदूर)

9 जानेवरी, भारत  विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी20 सामना (पुणे)

14 जानेवरी, भारत  विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहली वनडे सामना (मुंबई)

17 जानेवरी, भारत  विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा वनडे सामना (राजकोट)

19 जानेवरी, भारत  विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा वनडे सामना (बंगळुरू)

24 जानेवरी, भारत  विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी20 सामना (ऑकलंड)

26जानेवरी, भारत  विरुद्ध न्यूझीलंड, दूसरा टी20 सामना (ऑकलंड)

29 जानेवरी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा टी20 सामना (ऑकलंड)

31 जानेवरी, भारत  विरुद्ध न्यूझीलंड, चौथा टी20 सामना (ऑकलंड).

 

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही.

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं पाच शतकं झळकावली होती. ट्वेंटी-20तही त्यानं समाधानकारक कामगिरी केली आहे. रोहित एक वर्ष सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

शिखर धवन ऑगस्टमध्ये टीम इंडियाकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर होता. आता तोही कमबॅक करणार आहे. बुमराहनेही दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी माघार घेतली होती. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्येही गेला होता. संजू सॅमसनला ट्वेंटी-20 संघात पुन्हा स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया कधी व कुठे भिडणार?

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येईल.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाविराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतश्रीलंकाआॅस्ट्रेलियान्यूझीलंड