Join us

Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूर अडकला विवाहबंधनात; मराठमोळ्या मिताली परुळकरसोबत घेतले सातफेरे, PHOTOS

shardul thakur marriage: भारतीय संघाचा क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर विवाहबंधनात अडकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:45 IST

Open in App

shardul thakur wife । पालघर : शार्दुल ठाकूर आणि मिताली परूळकर सोमवारी विवाहबंधनात अडकले आहेत. शार्दूल आणि मिताली (MItali Parulkar) यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. शार्दुल आणि मिताली परुळकर यांचा नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा झाला होता. 15 महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. खरं तर शुक्रवारी लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

दरम्यान, हळदी समारंभामधील काही व्हिडीओ समोर आल्या होत्या. संगीत सेरेमनीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी हजेरी लावली होती. याशिवाय श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलची पत्नीही लग्नसोहळ्याला पोहोचली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी इंदूरमध्ये खेळली जाणार आहे, कर्णधार रोहित लग्न समारंभातून इंदूरला जाणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :शार्दुल ठाकूरलग्नभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डरोहित शर्मा
Open in App