Join us

मोहम्मद शमीची 'कसोटी', संघात स्थान पण खेळण्यावर प्रश्नचिन्ह; BCCIने दिली माहिती

team india announced for south africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 21:02 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ही मालिका संपताच टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आफ्रिकेत टीम इंडिया वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी अशा तीन मालिका खेळणार आहे. भारताच्या वन डे संघाची धुरा लोकेश राहुल, ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव आणि कसोटी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात असणार आहे. 

वन डे विश्वचषक गाजवणारा मोहम्मद शमी याला आगामी दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान मिळाले आहे. पण, शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून, अशी माहिती बीसीसीआयने दिली. त्यामुळे शमीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताचा कसोटी संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

कसोटी मालिकेचे वेळापत्रक २६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामोहम्मद शामीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ