Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना

India Tour Of England: पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:59 IST

Open in App

आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रवाना झाली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला येत्या २० जूनपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी असेल.

नुकतेच बीसीसीआयने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, यात ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. कुलदीप यादवचे नुकतेच लग्न झाल्याने तो काही दिवसांनी इंग्लंडला रवाना होईल, असेही सांगण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेबद्दल खेळाडू खूप उत्साहित दिसत आहेत.

भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी संघ जाहीर होण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघात पोकळी निर्माण झाली आहे. ही मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ युवा आणि काही अनुभवी खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. कर्णधार शुभमन गिल आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात करुण नायर, साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला. या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय कसोटी संघ:शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर,  जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

इंग्लंड कसोटी संघ:बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलगौतम गंभीर