Join us

भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता राहू नये, हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न; जावेद मियाँदादचं विधान, बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाला...

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादावर शेजारील माजी क्रिकेटपटू दररोज काहीना काही टिप्पणी करत असतात. शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा हे वादग्रस्त विधान करतात.. त्यात जावेद मियाँदाद ( Javed Miandad) हद्दच ओलांडताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 16:13 IST

Open in App

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादावर शेजारील माजी क्रिकेटपटू दररोज काहीना काही टिप्पणी करत असतात. शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा हे वादग्रस्त विधान करतात.. त्यात जावेद मियाँदाद ( Javed Miandad) हद्दच ओलांडताना दिसत आहे. नादिर अली पॉडकास्टवरील एका एपिसोडवर 'सुरक्षेच्या' कारणास्तव भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याबद्दल मियाँदाद यांना मत विचारण्यात आले, ज्यावर माजी कर्णधाराने वादग्रस्त विधान केले होते. त्याच पोडकास्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मियाँदाद म्हणाला होता की,"सुरक्षा विसरून जा. "आमचा विश्वास आहे की अगर मौत आनी है तो आनी... जिंदगी और मौत तो अल्लाह के हाथ में है " (जर तुमची नशिबात मरणे असेल तर तुम्ही मराल. जीवन आणि मृत्यू अल्लाहच्या हातात आहे. ) त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ. पण त्यांनीही इथे खेळायला यावे. आम्ही गेल्या वेळी गेलो होतो, पण तेव्हापासून ते इथे आले नाहीत. आता त्यांची वेळ आहे."

२००८च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून, भारताने पाकिस्तानशी आपले सर्व क्रिकेट संबंध तोडले आहेत.  पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही आणि केवळ भारत-पाकिस्तान सामने आयसीसी स्पर्धा आणि आशिया कप दरम्यान होतात. यावर मियाँदाद म्हणाला,'' भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता भारतीय राजकारण्यांनाच नको हवी आहे. दोन्ही देशांतील लोकांना शांतता हवी आहे आणि भारतातील कट्टरपंथीयांना हेच नको हवं आहे. नरेंद्र मोदी त्यांचे कार्ड खेळत आहेत. पाकिस्तानी कधी हिंदूंना त्रास देतोय असं तुम्ही ऐकलं आहे का? पण, भारतात आमच्या मुस्लीम भावांना जी वागणूक देतात, ते पाहून वेदना होतात.''

यावेळी मियाँदादला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात विचारले. तो म्हणाला, मी तेव्हा एका चॅनेलसाठी कार्यक्रम करायचो. मुंबईत असताना मला मातोश्रीवर बोलावण्यात आले. मी तिथे गेलो, खूप गर्दी होती. बाळासाहे व त्यांचे कुटुंबिय क्रिकेटचे फॅन होते. त्यांनी चांगला पाहुणचार केला.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानजावेद मियादादनरेंद्र मोदीबाळासाहेब ठाकरे
Open in App