Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."

Anaya Bangar Demand to BCCI, ICC: आधी मुलगा असलेली संजय बांगरची मुलगी अनाया बांगर सध्या क्रिकेटमध्ये कमबॅकच्या विचारात आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:45 IST2025-06-19T11:44:00+5:302025-06-19T11:45:45+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer Sanjay Bangar transgender daughter Anaya Bangar tell BCCI to think practically on transwoman cricket inclusion | Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."

Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Anaya Bangar Demand to BCCI, ICC: भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर याचा मुलगा आर्यन बांगर हार्मोनल शस्त्रक्रिया करून मुलगी झाला. आता ती अनाया बांगर या नावाने ओळखली जाते. अनाया बांगरने BCCI आणि ICC कडे एक विशेष मागणी केली आहे. ही मागणी ट्रान्सजेंडर महिलांबद्दल आहे. उघडपणे आपली ओळख सांगणाऱ्या ट्रान्सजेंडर खेळाडू अनायाने क्रिकेटमधील समावेश आणि निष्पक्षतेबाबत मागणी केली आहे. तिने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ट्रान्सजेंडर महिलांसाठी धोरणे तयार करण्याचे आवाहन केले आहे. हे धोरण विज्ञान आणि डेटा यावर आधारित असावे असेही तिने म्हटले आहे.


अनाया जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत यूकेमधील मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट येथे ८ आठवड्यांच्या संशोधन शिबिरात सहभागी झाली होती. या संशोधनात हार्मोन थेरपी (HRT) ने तिची ताकद, सहनशक्ती, हिमोग्लोबिन, ग्लुकोज पातळी आणि क्रीडा कामगिरीवर कसा परिणाम केला, यावर विचार करण्यात आला. या सर्वांची तुलना सिसजेंडर (जन्मानुसार महिला) खेळाडूंशी करण्यात आली. संशोधनाच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले की अनायाची हिमोग्लोबिन पातळी, ग्लुकोज नियंत्रण आणि ताकद सिसजेंडर महिला खेळाडूंइतकी किंवा त्यापेक्षाही कमी आहे. हार्मोन थेरपीमुळे तिच्या स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती लक्षणीयरित्या कमी झाली. ज्यामुळे तिचे शरीर महिलांच्या दर्जाच्या जवळ आले. अनायाने म्हटले आहे की, मी हे संशोधन केले, जेणेकरून आपण जुन्या समजुतींवर नव्हे तर तथ्यांवर आधारित संवाद साधू शकतो.


अनायाचे BCCI ला आवाहन

अनायाने ते संशोधन इन्स्टाग्रामवरही पोस्ट केले आहे. बीसीसीआयकडून काही महत्त्वाची पावले उचलण्याची तिने मागणी केली आहे. तिने म्हटले आहे की, क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर महिलांचा समावेश करण्यासाठी ठोस आणि वैज्ञानिक धोरणे बनवावीत. महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर महिलांचा समावेश करण्यासाठी खुल्या आणि वैज्ञानिक चर्चा सुरू केल्या पाहिजेत. हिमोग्लोबिन, टेस्टोस्टेरॉन पातळी आणि कामगिरी यासारख्या पॅरामीटर्सच्या आधारे पात्रता नियम बनवावेत. तज्ज्ञ, खेळाडू आणि कायदेशीर सल्लागारांच्या सहकार्याने धोरणे तयार करावीत, जी सर्वसमावेशक आणि निष्पक्ष असतील. अनाया म्हणते, "मला सहानुभूती नको आहे, तर तथ्य आणि सत्यावर आधारित जग हवे आहे. क्रिकेटमध्ये आमचा समावेश म्हणजे निष्पक्षता सोडून देणे नव्हे, तर पारदर्शक पद्धतीने त्याचे मोजमाप करणे असे पाहायला हवे."

Web Title: Indian cricketer Sanjay Bangar transgender daughter Anaya Bangar tell BCCI to think practically on transwoman cricket inclusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.