Join us

१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

Mohammad Shami Death Threat Email : शमी IPL खेळत असल्याने त्याच्या भावाने दिली पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:09 IST

Open in App

Mohammad Shami Death Threat Email : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला जीवे मारण्याची धमकी देणारा इमेल आला आहे. १ कोटी रुपये दे, नाही तर आम्ही तुला मारून टाकू असा धमकीचा इमेल मोहम्मद शमीला आला आहे. मोहम्मद शमी सध्या IPL खेळण्यात व्यग्र आहे. काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबाद संघाकडून तो खेळत आहे. तशातच त्याला जीवे मारण्याच्या धमकीचा इमेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मोहम्मद शमीच्या भावाने याबाबत उत्तर प्रदेशच्या अमरोहा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच अमरोहा सायबर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी राजपूत सिंदर नावाच्या एका तरुणाने मोहम्मद शमीच्या मेल आयडीवर एक ईमेल पाठवला. ज्यामध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मोहम्मद शमी सध्या सनरायझर्स हैदराबाद संघाशी संबंधित आहे आणि आयपीएल खेळत आहे. त्यामुळे धमकीचा मेल मिळाल्यानंतर त्याने त्याचा मोठा भाऊ हसीब अहमदला याची माहिती दिली. त्यानंतर मोहम्मद हसीब यांनी आज (सोमवारी) एसपी अमित कुमार आनंद यांची भेट घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणात सायबर पोलिस स्टेशनने एफआयआर नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीआयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादउत्तर प्रदेशपोलिससायबर क्राइम