Join us

भारताच्या क्रिकेटपटूने केलं भन्नाट प्रपोज, फोटो झाले वायरल

प्रपोज केल्यानंतर त्याने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले असून ते चांगलेच वायरल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:50 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळतोय. रविवारी झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला पराभव होता. पण सोमवारी मात्र भारताच्या एका क्रिकेटपटूने भन्नाट प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. प्रपोज केल्यानंतर त्याने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले असून ते चांगलेच वायरल झाले आहेत.

सध्याच्या घडीला भारतीय संघात निराशेचे वातावरण आहे. कारण भारतीय खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर चाहत्यांनीही भारतीय संघावर जोरदार टीका केली आहे. पण या सर्व गोष्टींनंतर आता या क्रिकेटपटूने केलेल्या प्रपोजची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे.

भारताच्या या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये तिनशे धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवागनंतर या भारतीय खेळाडूने त्रिशतक झळकावले होते. त्याचबरोबर यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबकडूनही तो खेळला होता. आता तरी तुम्हाला हा क्रिकेटपटू कोण ते समजले असेल? 

हा क्रिकेटपटू म्हणजे करुण नायर. करुणने गर्लफ्रेंड सनाया तकरीवाला हिला चक्क गुडघ्यावर बसून प्रपोज केले. त्यानंतर सनायाने करुणला हो म्हटले. त्यावेळी करुणनने तिला अंगठी गिफ्ट केली.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतभारत विरुद्ध इंग्लंड