निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय क्रिकेटपटूची पोस्ट चर्चेत; परिवर्तन दिसताच... 

भारतात निवडणुकीच अचंबित करणारे निकाल समोर आले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 18:32 IST2024-06-04T18:31:08+5:302024-06-04T18:32:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian cricketer Hanuma Vihari Receives NOC from Andhra Cricket Association Right After 'Things Change' in the State | निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय क्रिकेटपटूची पोस्ट चर्चेत; परिवर्तन दिसताच... 

निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय क्रिकेटपटूची पोस्ट चर्चेत; परिवर्तन दिसताच... 

भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारीला ( Hanuma Vihari ) आंध्र क्रिकेट असोसिएशनकडून ३ जून २०२४ रोजी त्याचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. रणजी ट्रॉफीमध्ये एका संघातून दुसऱ्या संघात जाण्यासाठी इच्छुक खेळाडूसाठी NOC आवश्यक असते. आंध्रप्रदेशच्या निवडणुकीत भाजप, टीडीपी आणि जनसेना पक्ष यांच्यातील युतीचा विजय झाल्यानंतर YCP वर टीका करताना विहारीने सोशल मीडिया या NOC चा फोटो पोस्ट केला. “मी २ महिन्यांपासून NOC मागत आहे, त्यांना मी ४ वेळा मेल केले. माझी एनओसी दिली नाही. आता परिस्थिती बदलली आहे, त्यांनी लगेच माझी एनओसी दिली," असे विहारीने पोस्ट केले. 


विहारीने सांगितले की YCPच्या कार्यकाळात त्याला एसीएकडून NOC नाकारण्यात आली होती, ज्या दरम्यान ३० वर्षीय खेळाडू आंध्र संघाच्या रणजी युनिटमधील एका खेळाडूला कथितपणे शिविगाळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संघातील वातावरण तापले होते. रिपोर्टनुसार विहारी ज्या खेळाडूवर चिडला होता, तो तरुण क्रिकेटपटू YCP शी संबंध असलेल्या राजकीय क्षेत्रातील कुटुंबातील आहे. या घटनेनंतर विहारीला संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि त्याने सोशल मीडियावर आपली तक्रार मांडली.

विहारीने तेव्हा म्हटले होते की, क्रिकेट असोसिएशनने आपल्याशी गैरवर्तन केले आणि त्यांच्यासाठी पुन्हा कधीही न खेळण्याची शपथ घेतो.  
विहारीला जन सेवा पार्टीच्या उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण याच्याकडून पाठींबा मिळाला होता.  

विहारीने पवन कल्याण यांचा पक्ष, जेएसपी, टीडीपी आणि भाजप यांच्यातील युतीच्या विजयाबद्दल सोशल मीडियावर लिहीले की, “१० वर्षांची चिकाटी, नियोजन आणि आता सत्ता... अभिनंदन @PawanKalyan @JanaSenaParty @JaiTDP. @naralokesh @ncbn. कर्माचे फळ मिळते."


 

Web Title: Indian cricketer Hanuma Vihari Receives NOC from Andhra Cricket Association Right After 'Things Change' in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.