Join us

Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर

आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबरला रंगणार आहे भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:27 IST

Open in App

India vs Pakistan: आशिया कप २०२५ स्पर्धेआधी भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.  कोणत्याही क्रीडा प्रकारात भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची आणि पाकिस्तानच्या संघालाही भारतात द्विपक्षीय स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही,  अशी भूमिका भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. सध्याच्या घडीला दोन्ही देशांतील द्विपक्षीय स्पर्धा होणं शक्य नाही, ही ठाम भूमिका मांडताना क्रीडा मंत्रालयाकडून आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्यासंदर्भातील चित्रही स्पष्ट करण्यात आले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

  भारत-पाक सामन्याचं काय?

आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यात १४ सप्टेंबरला सामना नियोजित आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पाकविरुद्ध खेळणार की, नाही हा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. पीटीआयने क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,  आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळण्या पासून रोखण्यात येणार नाही. कारण ही एक बहुदेशीय स्पर्धा आहे. द्विपक्षीय मालिकेत भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या दरीचा अशा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, हे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसते. 

घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...

 भारत-पाक द्विपक्षीय मालिकेला ब्रेक, पण..

दोन्ही देशांतील राजकीय तणावपूर्ण वातावरणाचा क्रिकेट स्पर्धावरही मोठा परिणाम झाला आहे. २०१३ पासून भारत-पाक यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेसह आणि आशिया कप स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारतात असताना ही स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतही भारतीय संघाने पाकविरुद्ध खेळू नये, असा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआय असो वा भारतीय संघातील खेळाडू पाकविरुद्ध खेळण्यासंदर्भातील प्रश्नावर सरकारचा निर्णय अंतिम अशी भूमिका राहिली आहे. त्यात आता क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेमुळे याआधीप्रमाणे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. अधिकृतरित्या यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ