IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO

भारतीय संघातील खेळाडू बाप्पाच्या चरणी; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:53 IST2026-03-04T18:52:46+5:302026-03-04T18:53:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian Cricket Team Star Abhishek Sharm Ishan Kishan And Axar Patel Offered Prayers At Shree Siddhivinayak Ganapati Temple Befor Will Face England In Semi Final Match ICC T20 World Cup 2026 Watch | IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO

IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO

टी-२० विश्व चषक २०२६ स्पर्धेतील भारत-इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपद उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल. यंदाच्या हंगामात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील एक पराभव सोडला तर प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. पण अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आले, पण ज्या फटकेबाजीची अपेक्षा होती, ते त्याला जमलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी भारताच्या सलामीवीरांने आपल्या सहकाऱ्यांसह सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले. 

भारतीय संघातील खेळाडू बाप्पाच्या चरणी; व्हिडिओ व्हायरल

 इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार अक्षर पटेल, सलामीवीर अभिषेक शर्मासह ईशान किशनची झलकही पाहायला मिळते. या तिघांनी मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली. 

अभिषेक शर्मा संघर्ष करताना दिसला; नॉकआउटमध्ये दमदार कमबॅकची आस 

पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळणारा अभिषेक शर्मा पहिल्या तीन डावात खातेही उघडू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या सामन्यात खाते उघडले. पण अवघ्या १५ धावांवर तो बाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची संयमी खेळी त्याच्या भात्यातून पाहायला मिळाली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पुन्हा तो अवघ्या १० धावांवरच परतला. आता नॉकआउटमध्ये त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल. 

ईशान किशनसह अक्षर पटेलवरही असेल मोठी जबाबदारी

अभिषेक शर्माशिवाय ईशान किशन आणि अक्षर पटेल हे देखील संघातील प्रमुख खेळाडू आहेत. उप कर्णधार अक्षर पटेल गोलंदाजी आणि फलंदाजीत उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय ईशान किशनवर आघाडीच्या फळीत संघाला शानदार सुरुवात करुन देण्याची मोठी जबाबदारी असेल.

Web Title : भारत बनाम इंग्लैंड सेमीफाइनल से पहले खिलाड़ियों ने लिया आशीर्वाद।

Web Summary : इंग्लैंड के खिलाफ सेमीफाइनल से पहले, भारतीय खिलाड़ी अभिषेक शर्मा, इशान किशन और अक्षर पटेल ने सिद्धिविनायक मंदिर में आशीर्वाद लिया। शर्मा फॉर्म में संघर्ष के बाद वापसी करना चाहते हैं, जबकि किशन और पटेल पर बड़ी जिम्मेदारी है।

Web Title : Indian cricketers seek blessings before crucial semi-final against England.

Web Summary : Ahead of the semi-final clash against England, Indian players Abhishek Sharma, Ishan Kishan, and Axar Patel visited Siddhivinayak Temple for blessings. Sharma aims for a strong comeback after struggling form, while Kishan and Patel carry significant responsibility.