Join us

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

इंग्लंड दौऱ्याआधी कोच गंभीरनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:06 IST

Open in App

Gautam Gambhir Along With His Wife Natasha Jain Visited Siddhivinayak Ganapati Temple : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने गुरुवारी सहपत्नीक  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भेट दिली. सध्याच्या घडीला एका बाजूला भारतीय संघातील खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र आहेत. दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर गौतम गंभीर मोठ्या सुट्टीवर असल्याचे दिसते. आयपीएलची सांगता होताच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक दौऱ्याआधी भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे पाहायला मिळाले.  पत्नी नताशा जैनसह तो मंदिरात पोहचा होता. दोघांनी जोडीनं मंदिरात पूजाही केल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गंभीरनं सोशल मीडियावरून शेअर केले फोटो 

कोचच्या रुपात नव्या टीम इंडियाची आस असणाऱ्या गौतम गंभीर याने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सिद्धिविनायक मंदिरातील पत्नीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये दोघेही हात जोडून मंदिरात प्रार्थना करत असल्याचे दिसून येते. याशिवाय दुसऱ्या फोटोत या जोडीनं मंदिरात केलेल्या पूजेची झलक पाहायला मिळते. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. 

IND vs ENG : दोन्ही संघात आतापर्यंत किती कसोटी सामने झाले अन् कुणाचा रेकॉर्ड आहे भारी?

भारतीय कसोटीत गंभीर पर्व; टीम इंडियाकडून खंबीर कामगिरी करुन घेण्याचं चॅलेंज  

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला कसोटीत धमक दाखवता आलेली नाही. घरच्या मैदानात भारतीय संघाला आधी न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघानला ३-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच इंग्लंड दौरा हा गंभीरसाठीही चॅलेंजिंग असेल. विराट कोहली अन् रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर भारतीय कसोटीत गंभीर पर्व सुरु झाल्याची चर्चाही रंगताना दिसते. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :गौतम गंभीरऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघ