Join us  

विराटसमोर कोण 'किंग खान', कोण 'दीपवीर'?; 'Brand Value'त बॉलिवूड सेलिब्रेटी पिछाडीवर! 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा देशातील टॉप सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 11:01 AM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा देशातील टॉप सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. कोहलीनं सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रेटींमध्ये टॉप राहिला. त्याच्या मागोमाग बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार असला तरी दोघांच्या मिळकतीत प्रचंड तफावत आहे. 2019च्या तुलनेत कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 39 टक्क्यांनी वाढली असून त्याची ब्रँड व्हॅल्यू वर्षाला 237.5 मिलियन ( 16,91,36,81,250 भारतीय रकमेत) इतकी झाली आहे. 

जगभरात मोठा चाहता वर्ग असलेल्या कोहलीची प्रत्येक खेळी विक्रमाला गवसणी घालणारी असते. त्याची सातत्यपूर्ण खेळी ही भल्याभल्यांना अचंबित करणारी आहे. त्याच्या या मैदानावरील कामगिरीचा त्याला ब्रँड व्हॅल्यू उंचावण्यासाठी फायदा होता. ग्लोबल सल्लागार कंपनी डफ अँड फेल्प्स यांच्या सर्वेक्षणानुसार कोहलीची ब्रँड व्हॅल्यू ही अक्षय कुमार, शाहरुख खान आणि रणवीर  सिंग- दीपिका पादुकोन या बॉलिवूड सेलिब्रेटिंपेक्षाही अधिक आहे. खिलाडी अक्षयनं यंदा दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहेय त्याची यंदा ब्रँड व्हॅल्यूत 55.3 टक्क्यांनी वाढून 104.5 मिलियन  इतकी झाली आहे. दीपिका आणि रणवीर ही जोडी ( 93.5 मिलियन) तिसऱ्या आणि शाहरुख खान ( 66.1 मिलियन) चौथ्या स्थानी आहे. 

कोहलीनं 2019 हे वर्ष गाजवलं. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील अपयशानंतर कोहलीनं आतापर्यंत सलग 11 मालिका जिंकल्या आहेत. ब्रँड व्हॅल्यूमध्ये टॉप 20मध्ये केवळ चारच क्रिकेटपटू आहेत. महेंद्रसिंग धोनी ( 41.2 मिलियन) क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक येतो.  

टॉप सेलिब्रेटी

1 - विराट कोहली - 237.5 मिलियन2 - अक्षय कुमार - 104.5 मिलियन3 - दीपिका पादुकोन - 93.5 मिलियन4 - रणवीर सिंग - 93.5 मिलियन5- शाहरुख खान - 66.1 मिलियन6 - सलमान खान - 55.7 मिलियन7 - आलीया भट - 45.8 मिलियन8 - अमिताभ बच्चन - 42.5 मिलियन9 - महेंद्रसिंग धोनी - 41.2 मिलियन10 - आयुषमान खुराणा  - 40.3 मिलियन15 - सचिन तेंडुलकर - 25.1 मिलियन20 - रोहित शर्मा - 23 मिलियन 

टॅग्स :विराट कोहलीअक्षय कुमारदीपिका पादुकोणरणवीर सिंगसलमान खानमहेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकररोहित शर्मा