Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : सूर्याला हे अजिबात मान्य नाही! न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी मोठं वक्तव्य, म्हणाला...

काही झालं तर दृष्टिकोन बदलणार नाही, सूर्यानं स्पष्ट केली आपली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 22:06 IST

Open in App

Suryakumar Yadav Gives A Big Statement About His Own Form :  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी, २१ जानेवारीला नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी सूर्यकुमार यादवला फलंदाजीतील त्याच्या खराब फॉर्मसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रिप्लाय देताना भारतीय कर्णधारानं मोठं वक्तव्य केले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाचा हिट शो, पण  कॅप्टन फ्लॉप

भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडल्यापासून सूर्याच्या बॅटला 'ग्रहण' लागले आहे. एका बाजूला टीम इंडियाचा विजय सिलसिला अन् दुसऱ्या बाजूला कर्णधार सूर्याचा फ्लॉप शो.. ही गोष्ट सातत्याने चर्चेचा विषय राहिली आहे. तो फक्त कर्णधार असल्यामुळेच संघात आहे, अशा प्रतिक्रियाही उटत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी त्याला फलंदाजीतील खराब कामगिरीबद्दलच्या मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने आपल्या फॉर्मपेक्षा संघाची विजय मोहिम कायम ठेवण्यासाठी जी रणनिती आवश्यक आहे त्यावर अधिक भर देण्याला महत्व देतो, असे म्हटले आहे.

IND vs NZ T20I : शंभर टक्के ‘सेंच्युरी’! सूर्या दादा थेट विराट–रोहितच्या खास पंक्तीत सामील होणार

काही झालं तर दृष्टिकोन बदलणार नाही, सूर्यानं स्पष्ट केली आपली भूमिका

२०२५ च्या संपूर्ण वर्षभरात सूर्यकुमार यादवने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. खराब फॉर्मसंदर्भातील प्रश्नावर तो म्हणाला की, "मागील तीन-चार वर्षांत ज्यामुळे यश मिळालं, त्याच आक्रमक शैलीत खेळण्याला पसंती देईन.  त्यात बदल करण्याची गरज वाटत नाही.  नेट्समध्ये मी खूप चांगली फलंदाजी करत आहे. आक्रमक शैलीतच फलंदाजी करण्याची रणनिती कायम ठेवेन. यश मिळाले तर ठीक नाहीतर पुन्हा त्यावर काम करेन." असे म्हणत काहीही झालं तरी आक्रमक शैलीत खेळण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही, अशी ठाम भूमिका त्याने मांडली आहे. 

संघाच्या विजय हेच समाधान

कर्णधाराच्या रुपातील  जबाबदारीवर बोलताना सूर्या म्हणाला की, "संघाचं हित हे वैयक्तिक विक्रमांपेक्षा नेहमीच वरचढ असतं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथं वैयक्तिक यशाचा विचाराला थारा नाही. माझं पहिलं उद्दिष्ट संघाच्या कामगिरीवर असते. संघ जिंकत असेल, तर मी समाधानी आहे." असे म्हणत आपल्या कामगिरीपेक्षा संघाच्या यशाचा आलेख उंचावण्यावर भर दे असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Suryakumar Yadav unfazed by form slump before New Zealand T20 series.

Web Summary : Suryakumar Yadav prioritizes team victory over personal form slump before the New Zealand T20 series. He emphasizes aggressive batting, focusing on team success.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादव