Join us

जागतिक महिला दिनी उमेश यादवच्या घरी आली नन्ही 'परी'! दुसऱ्यांदा झाला बाबा

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:04 IST

Open in App

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. भारताकडे २-१ अशी आघाडी असली तर अहमदाबाद कसोटी जिंकून त्यांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील स्थान पक्के करते येणार आहे. त्यामुळे खेळाडू कसून सराव करत आहेत. या तणावपूर्ण वातावरणात भारतीय गोलंदाज उमेश यादव ( Umesh Yadav) याच्या घरी नन्ही परी आली आहे. जागतिक महिला दिनी भारतीय क्रिकेटपटूला कन्यारत्न मिळाला आहे. उमेशने सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी उमेशच्या वडिलांचे निधन झाले होते आणि दुःखमय वातावरणात नन्ही परीच्या आगमनाने यादव कुटुंबात पुन्हा आनंद परतला आहे. 

उमेश यादवचा जन्म २५ ऑक्टोबर १९८७ साली नागपूर येथे झाला. उमेशने २९ मे २०१३ मध्ये गर्लफ्रेंड तान्या वाधवाला चार वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. तान्या ही फॅशन डिझायनर आहे  आणि उमेशच्या ड्रेसिंग स्टाईल तिच पाहते. लग्नाच्या सात वर्षानंतर उमेश व तान्या यांच्या घरी परी आली. १ जानेवारी २०२१ मध्ये त्यांना मुलगी झाली आणि आज ८ मार्च २०२३ मध्ये पुन्हा त्यांच्या घरी पाळणा हलला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघनागपूर
Open in App