India Women vs Sri Lanka Live Streaming, Cricket World Cup Match Start Time : आशिया कप स्पर्धेनंतर आता भारत-श्रीलंकेच्या मैदानात वर्ल्ड चॅम्पियन होण्याची स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचं संयुक्त यजमानपद मिरवणाऱ्या भारत आणि श्रीलंका महिला संघाच्या लढतीसह १३ व्या हंगामातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इथं एक नजर टाकुयात कुठं कधी रंगणार सामना? IND W vs SL W यांच्यातील लढत कुठं पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IND W vs SL W यांच्यातील सलामीची लढत कधी अन् कुठं रंगणार?भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीची लढत ही गुवाहटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याआधी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे. या समारंभात पाकिस्तानशिवाय स्पर्धेतील सहभागी सर्व संघ सहभागी होतील.
ICC Women's Cricket World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी लढणार 'रन'रागिणी; जाणून घ्या सविस्तरIND W vs SL W टेलिव्हिजनवरील कोणत्या चॅनेलवर प्रसारित होईल?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रसारणा हक्क हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. स्टार स्पोर्ट्स 1/एचडी आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी/एचडी या चॅनेलवर भारत-श्रीलंकेसह वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामन्यांचा आनंद घेता येईल.
IND vs SL यांच्यातील मॅच Live Streaming कुठं उपलब्ध असेल?
जर मोबाईलवर या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर ऑनलाइन स्ट्रीमिंग JIOHotstar ॲप आणि वेबसाइट क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय स्पर्धेतील खास रेकॉर्ड, सामन्यांचे निकालासाठी तुम्ही लोकमत.डॉट कॉम वेबसाइटला फॉलो करा.
Web Summary : India and Sri Lanka women's teams will kick off the World Cup. The match starts at 3 PM IST in Guwahati. Live broadcast on Star Sports, streaming on JIOHotstar. Follow Lokmat.com for updates.
Web Summary : भारत और श्रीलंका की महिला टीमें विश्व कप की शुरुआत करेंगी। मैच गुवाहाटी में दोपहर 3 बजे IST पर शुरू होगा। स्टार स्पोर्ट्स पर सीधा प्रसारण, JIOHotstar पर स्ट्रीमिंग। अपडेट के लिए Lokmat.com को फॉलो करें।