India Women vs Australia Women 1st ODI Live Streaming : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिका जिंकल्यावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया आता वनडे मालिकेसाठी सज्ज आहे. २४ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या मैदानात जगजेत्ता ठरल्यावर टीम इंडियासाठी ही पहिली वनडे मालिका आहे. दशकभरानंतर टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाचे मैदान गाजवल्यावर वनडे मालिका जिंकून भारतीय संघ जगात भारी असल्याचा आपला रुबाब दाखवून देण्यासाठी मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात कधी आणि कुठं खेळवण्यात येणार आहे भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील पहिला वनडे सामना? क्रिकेट चाहत्यांना लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातू कसा घेता येईल या सामन्याचा आनंद यासंदर्भातील सविस्तर माहिती...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कधी आणि कुठे रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील पहिला वनडे सामना 24 फेब्रुवारी रोजी ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे.
IND W vs AUS W यांच्यातील Live Streaming आणि Telecast कुठे पाहता येईल?
- भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार
- लाईव्ह टेलिकास्ट: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील वनडेकीव हेड-टू-हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघात आतापर्यंत ६१ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिल्याचे दिसून येते. पण वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला असला तरी भारतीय संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे टी २० मालिकेतील यशाची पुनरावृत्ती वनडेतही करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
- ऑस्ट्रेलिया – ४९ विजय
- भारत – १२ विजय