अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

प्रतिका रावलची १२९ चेंडूत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५४ धावांची दमदार खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:19 IST2025-01-15T17:15:06+5:302025-01-15T17:19:50+5:30

whatsapp join usJoin us
India Women Batter Pratika Rawal Set World Record Against Ireland Women With 444 Runs In First 6 ODI Appearances Surpassing Natthakan Chantham | अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Women Batter Pratika Rawal Set World Record Against Ireland Women : प्रतिका रावल हिने सातत्यपूर्ण खेळीचा नजराणा पेश करत पुन्हा एक दमदार खेळी साकारलीये. राजकोटच्या मैदानात रंगलेल्या आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात तिने वनडे कारकिर्दीतील आपले पहिले वहिले शतक साजरे केली. ही खेळी आणखी मोठी करत तिने वर्ल्ड रेकॉर्डचा डाव साधला आहे. आतापर्यंत जे कोणत्याही बॅटरला जमलं नाही ते तिनं करून दाखवलं आहे. तिने ६ वनडेत मोठा डाव साधला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

प्र​तिका रावलने साकारली १५४ धावांची खेळी
 
महिला क्रिकेटमधील भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील तिसऱ्या  आणि अखेरच्या वनडे सामन्यात प्रतिका रावल हिने १२९ चेंडूत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५४ धावांची दमदार खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावरच भारतीय महिला संघाने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ४०० पारचा आकडा पार केला. तिच्याशिवाय कार्यवाहू कर्णधार स्मृती मानधना हिच्या बॅटमधून शतकी खेळी पाहायला मिळाले. 

वनडेत भारतीय महिला संघाकडून सर्वोच्च खेळी करणारी तिसरी बॅटर ठरली प्रतिका


प्रतिका रावल हिने आपल्या पहिल्या वहिल्या शतकी खेळीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. भारताकडून वनडेत वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या बॅटरच्या यादीत प्रतिका तिसऱ्या क्रमांकावर पोहचलीये. या यादीत दीप्ती शर्मा १८८ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तिने २०१७ मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ही खेळी साकारली होती. हरमनप्रीत कौरनंही २०१७ मध्येच १७१ धावांची नाबाद खेळी केली होती. या दोघींच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर प्रतिका रावलचा नंबर लागतो.

पहिल्या ६ वनडे सामन्यात ४४४ धावांसह नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड 

प्रतिका रावल हिने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेतून टीम इंडियात पदार्पण केले. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत शेवटच्या सामन्यात तिच्या भात्यातून आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आली. पहिल्या दीड शतकी खेळीसह ६ वनडे सामन्यात तिच्या नावे ४४४ धावांची नोंद झाली आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये याआधी पहिल्या ६ वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा थायलंंडच्या नत्ताकम चांतम हिच्या नावे होता. तिने पहिल्या ६ वनडेत ३२२ धावा केल्या होत्या. आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात १५४ धावांची खेळी करत प्रतिकाने तिला मागे टाकून नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. तिचा हा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा आहे.

प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

२४ वर्षीय प्रतिका रावल ही शफाली वर्माच्या जागी टीम इंडियात आली आहे. शफाली वर्मा ही आपल्या स्फोटक अंदाजासाठी ओळखली जाते. कमालीची क्षमता असणारी ही बॅटर कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे संघाबाहेर गेलीये. तिच्या जागी खेळताना  प्रतिका रावल हिने संधीच सोनं करून दाखवलं आहे. सातत्यपूर्ण दमदार कामगिरीसह तिने पहिल्या ६ सामन्यात सेट केलेला वर्ल्ड रेकॉर्ड हा शफाली वर्मासाठी टेन्शन देणारा असाच आहे.
 

Web Title: India Women Batter Pratika Rawal Set World Record Against Ireland Women With 444 Runs In First 6 ODI Appearances Surpassing Natthakan Chantham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.