India vs West Indies, 1st Test, Day 1, Jasprit Bumrah Mohammed Siraj Shine West Indies All Out 162 1st Innings : मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या जोडीनं कॅरेबियन बेटांवरून आलेल्या पाहुण्यांच भेदक माऱ्यासह स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजीसमोर पाहुण्या संघाच्या ताफ्यातील एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. परिणामी वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तासाभरातच सिराजचा 'चौकार'; कुलदीपच्या विकेटसह लंच आधी अर्धा संघ तंबूत
वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावातील चौथ्या षटकात मोहम्मद सिराजनं सलामीवीर टॅगेनरीन चंद्रपॉल याला खातेही न उघडू देता तंबूचा रस्ता दाखवला. १० सामन्यांचा अनुभव असलेल्या या सलामीवीरानं एक द्विशतकही ठोकलं आहे. पण त्यानंतर त्याची बॅट काही तळपलेली नाही. कमबॅकची संधी मिळाल्यावर तो याचं सोनं करेल अन् संघाला चांगली सुरुवात करून देईल, अशी अपेक्षा होती. पण सिराजसमोर तो झिरो ठरला. दुसऱ्या बाजूला जॉन कॅम्पबेलच्या रुपात दुसऱ्या सलामीवीराच्या रुपात जसप्रीत बुमराहनं आपल्या विकेटचं खात उघडलं. त्यानंतर ठराविक अंतराने सिराजनं कॅरेबियन संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्याने आपल्या खात्यात ४ विकेट्स जमा केल्या. कुलदीपच्या एका विकेटसह उपहाराआधीच वेस्ट इंडिजचा अर्धा संघ अवघ्या ९० धावांवर तंबूत परतला होता. या सामन्यात कुलदीपनं २ विकेट्स घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनंही एक विकेट घेतली.
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
बुमराहनं आपल्या खात्यात जमा केल्या ३ विकेट्स
जसप्रीत बुमराहनं तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावताना सलामीवीरासह आणखी दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील ५ जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्यांनी हा आकडा गाठला ते या खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. संघाकडून जस्टिन ग्रेव्हस याने ४८ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. ही कॅरेबियन संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय शाई होप २६ (३६) आणि कर्णधार रॉस्टन चेस २४ (४३) धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजच्या संघातील ५ फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही.