IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : सिराज-बुमराह जोड गोळीनं केलेला भेदक मारा अन् फलंदाजीत KL राहुलच्या क्लास खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीतील पहिला दिवस गाजवला. तिन्ही सत्रात भारतीय संघाने छाप सोडली. पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांवर आटोपला. त्यानंतर लोकेश राहुलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर २ विकेट्सच्या मोबदल्यात १२१ धावा केल्या. केएल राहुल अन् शुबमन गिल ही जोडी दुसऱ्या दिवशी ४१ धावांची पिछाडी भरून काढत मोठी आघाडी मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॉलिंगनंतर टीम इंडियाची दमदार बॅटिंग
वेस्ट इंडिजचा पहिला डाव आटोपल्यावर पहिल्या दिवशीच भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची दमदार सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. सील्सनं यशस्वीच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. तो ५४ चेंडूत ३६ धावा करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या साई सुदर्शनला पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली. पण तो या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्याने १९ चेंडूत ७ धाा करत मैदान सोडले. दुसऱ्या बाजूला केएल राहुलनं संयमी खेळी केली. पण या दरम्यान तो क्रॅम्प्समुळे वेदनांनी व्याकूळ झाल्याचे दिसले.
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
केएल राहुल लंगडताना दिसला, कुलदीप यादव पॅड बांधून बसला, पण...
लोकेश राहुल एकदम लयीत दिसत होता. पण ३१ व्या षटकात क्रॅम्प्समुळे तो वेदनांनी व्याकूळ झाल्याचे दिसून आले. चेंडू मारण्यापेक्षा पळून धाव काढणं त्याच्यासाठी जिकीरीचं झालं होते. तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना फिजिओ मैदाना आल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ड्रेसिंग रुममध्ये कुलदीप यादवला नाईट वॉचमनच्या रुपात बॅटिंगला येण्यासाठी तयार झाला. तो बॅटिंगसाठी नटला, पण लंगडत खेळताना दिसलेला केएल राहुलनं फिफ्टीही मारली अन् दिवसाअखेर तो नाबादही परतला. खेळ थांबला त्यावेळी लोकेश राहुल ११४ चेंडूचा सामना करून नाबाद ५३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला कर्णधार शुबमन गिल ४२ चेंडूचा सामना करून १८ धावांवर खेळत होता.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक ४ तर जसप्रीत बुमराहनं ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय कुलदीप यादवनं २ आणि वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : India dominated Day 1 against West Indies. Rahul's fifty led India to 121/2 after West Indies were bowled out for 162, Siraj taking 4 wickets. Rahul battled cramps to remain unbeaten.
Web Summary : वेस्ट इंडीज के खिलाफ पहले दिन भारत का दबदबा रहा। राहुल के अर्धशतक से भारत 121/2 पर, वेस्ट इंडीज 162 पर ऑल आउट, सिराज ने 4 विकेट लिए। राहुल क्रैम्प्स से जूझते हुए नाबाद रहे।