India vs West Indies 2nd ODI: भारताने नाणेफेक जिंकली, संघात काय आहेत बदल ते पाहा

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार, असे म्हटले जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 07:01 PM2019-08-11T19:01:36+5:302019-08-11T19:02:04+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies 2nd ODI: India won the toss, see what changes the team has | India vs West Indies 2nd ODI: भारताने नाणेफेक जिंकली, संघात काय आहेत बदल ते पाहा

India vs West Indies 2nd ODI: भारताने नाणेफेक जिंकली, संघात काय आहेत बदल ते पाहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार, असे म्हटले जात होते.

पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संघात बदल करायचा का, हा प्रश्न भारताच्या संघ व्यवस्थापनापुढे होता. पण भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात कोणताच बदल केलेला नाही.


दुसऱ्या सामन्यात पडणार का पाऊस, जाणून घ्या हवामानाचा अंदाज
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसऱ्या सामन्यातही पाऊस खोडा घालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. दुसऱ्या सामन्याच्या वेळी वातावरण कसे असेल, याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दुसऱ्या सामन्यापूर्वी जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे भारतीय संघाला इनडोअर सराव करावा लागला होता. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आणि फिरकीपटू कुलदीप यांनी तर हॉटेलमध्ये पीच बनवून खास सराव केला होता. यावेळी रोहित शर्माचा छत्रीमधला फोटो चांगलाच वायरल झाला होता.

दुसऱ्या सामन्यापूर्वी पाऊस पडला होता. पण या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले जात असून खेळाडू आणि चाहत्यांसाठी ही खूषखबर आहे.

पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात फक्त 13 षटकांचा खेळ झाला. पण या 13 षटकांमध्येच कोहलीला धोनीची आठवण आल्याचे पाहायला मिळाले. धोनी जेव्हा संघात असतो तेव्हा तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर तो काही निर्णयांमध्ये महत्वाची भूमिकाही बजावत असतो.

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या चौथ्या षटकात एक गोष्ट घडली आणि कोहलीला धोनीची आठवण आली. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईस चकला आणि चेंडू पॅडवर आदळला. त्यानंतर शमीने जोरदार अपील केली, पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. यावेळी रीव्ह्यू घ्यायचा की नाही, हे कोहलीने यष्टीरक्षक रिषभ पंतला विचारले. पण पंतने यावेळी योग्य निर्णय सांगितला नाही. त्यामुळे कोहलीने रीव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने या चेंडूचा रीप्ले दाखवण्यात आला. त्यावेळी हा चेंडू थेट स्टम्पला लागत असल्याचे दिसत होते. त्यामुळे पंतने जर रीव्ह्यू घ्यायला सांगितला असता तर लुईस आऊट झाला असता. त्यावेळी कोहलीला धोनीची आठवण आली असेल. कारण धोनी बहुतांशी वेळा रीव्ह्यू घ्यायचा की नाही, याबाबत योग्य निर्णय घेतो.

Web Title: India vs West Indies 2nd ODI: India won the toss, see what changes the team has

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.