Join us

India vs West Indies, 1st Test : कर्णधार विराट कोहलीचा दांडिया डान्स, व्हिडीओ व्हायरल

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केले. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:21 IST

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारताने 318 धावांनी यजमान विंडीजला नमवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जारोवर भारताने हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम नावावर केले. या सामन्यात कोहलीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. सामना सुरु असताना कोहली चक्क दांडिया खेळताना दिसला. त्यामुळे नवरात्री आली की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला.

कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी 

भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. हे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. 

पाहा व्हिडीओ...  

कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय

कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी

बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम

वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली