India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:57 AM2019-08-26T11:57:41+5:302019-08-26T11:58:37+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 1st Test : 100th win as captain for Virat Kohli in 152 International matches | India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शंभरावा विजय ठरला. 

कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय

कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी

या निकालासह भारताने परदेशातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. यापूर्वी 2017मध्ये गॅले कसोटीत भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी मात केली होती. विशेष म्हणजे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या ( धावांच्या फरकाने) अव्वल पाचपैकी चार विजय हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. कसोटी सामन्यात भारताने धावांच्या फरकाने मिळवलेल्या मोठ्या विजयात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत अव्वल स्थानी आहे. दिल्लीत 2015मध्ये झालेल्या कसोटीत भारताने 337 धावांनी आफ्रिकेला नमवले होते. 

बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम

त्यानंतर इंदौर कसोटीत 2016मध्ये न्यूझीलंडला 321, मोहाली कसोटीत 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाला 320 धावांनी हार मानण्यास भाग पाडले होते. परदेशात भारताने रविवारी मिळवलेला विजय हा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला. तत्पूर्वी 2017मध्ये श्रीलंकेला 304 धावांनी त्यांच्याच घरी टीम इंडियाने पराभूत केले होते. या अव्वल पाच विजयापैकी 2008ची कसोटी वगळल्यास चार विजय हे कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवलेले आहेत.

वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट
कर्णधार म्हणून कोहलीचा हा शंभरावा विजय ठरला. त्याने 27 कसोटी, 58 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत कर्णधार म्हणून विजय साजरे केले आहेत. कोहलीनं 152 आंतरराष्ट्रीय सामन्यांत हा पल्ला सर केला. विजयाचे शतक साजरे करणारा कोहली हा तिसरा भारतीय, तर 12वा आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे. भारतीय कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी 178 विजयासह आघाडीवर आहे,तर  मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर 104 विजय आहेत. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (220) अव्वल स्थानावर आहे. सर्वात जलद 100 विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये कोहली चौथ्या स्थानी आहे. पाँटिंग ( 134 सामने), स्टीव्ह वॉ ( 150) आणि हॅन्सी क्रोन्ये ( 151) अव्वल तिघांत आहे. 

Web Title: India vs West Indies, 1st Test : 100th win as captain for Virat Kohli in 152 International matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.