Team India on top ICC World Test Championship point table | ICC World Test Championship :'कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी 
ICC World Test Championship :'कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी 

मुंबई, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद : भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेची दमदार खेळी यांना या विजयाचे श्रेय जाते. ही कसोटी मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत असल्यानं या विजयाचा गुणतालिकेवर परिणाम पाहायला मिळाला. 

कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय

कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत येणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी आयसीसीनं गुणांची विभागणी केली आहे. त्यानुसार भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून 60 गुणांची कमाई केली आहे. या विजयामुळे भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्या खात्यातील गुणांची संख्या समसमान आहे. पण, भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंड प्रत्येकी 32 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम

वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट

कशी होते गुणांची विभागणी?
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. त्यानुसार विजयी संघाला 60 गुण मिळतील. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.
 

 


Web Title: Team India on top ICC World Test Championship point table
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.