India vs West Indies 1st Test Shubman Gill On Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेनंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ घरच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झालाय. २ ऑक्टोबर पासून दोन्ही संघ अहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील कसोटी सामन्यातून या मालिकेला सुरुवात करतील. बुधवारपासून रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्लेइंग इलेव्हनचं कोडं कायम ठेवताना त्याने अतिरिक्त जलदगती गोलंदाजासह मैदानात उतरण्याची हिंट दिलीये. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फिरकीची जादू पाहायला मिळाली आहे. मग भारतीय संघ अतिरिक्त गोलंदाजाचा विचार का करतोय? शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनसंदर्भात काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!पहिल्या कसोटीआधी प्लेइंग इलव्हनसंदर्भात काय म्हणाला शुबमन गिल?वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय कर्णधाराने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शुबमन गिल म्हणाला की, मॅचच्या दिवशी खेळपट्टी पाहून प्लेइंग इलेव्हनसंदर्भातील निर्णय घेतला जाईल. सध्याचे हवामान आणि परिस्थिती पाहता एक अतिरिक्त सीमर खेळवण्याचा विचार मनात येतोय, असे म्हणत टीम इंडियाच्या ताफ्यात अतिरिक्त गोलंदाजाला संधी मिळू शकते, अशी हिंटच त्याने दिलीये.
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
छोट्या फॉरमॅटमधून लगेच मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळणं आव्हानात्मक, पण...
आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ फारच कमी वेळात कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. मानसिकदृष्ट्या ही गोष्ट आव्हानात्मक असले तरी तांत्रिकदष्ट्या सक्षम असाल तर ते फार आव्हानाम्क वाटत नाही, असेही गिलनं म्हटले आहे. यावेळी शुबमन गिलला जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडसंदर्भातील प्रश्नही विचारण्यात आला होता. पण कर्णधाराने पुन्हा एकदा संघातील प्रमुख खेळाडूबद्दल संभ्रमात टाकणारे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.
बुमराह खेळणार की नाही?
जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? यावर गिल म्हणाला की, यासंदर्भातील निर्णय आम्ही सामन्यानुसार घेणार आहोत, अजून त्यासंदर्भात काहीच ठरलेले नाही. त्याने किती षटके टाकली? संघातील अन्य गोलंदाजांची परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून बुमराहच्या वर्कलोडसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगत गिलनं प्रमुख गोलंदाजांच्या खेळण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे.
Web Summary : Shubman Gill hints at extra seamer for West Indies test. Bumrah's inclusion uncertain, decision pending based on match conditions and workload assessment.
Web Summary : शुभमन गिल ने वेस्टइंडीज टेस्ट के लिए अतिरिक्त सीमर का संकेत दिया। बुमराह को शामिल करना अनिश्चित, मैच की स्थिति और वर्कलोड मूल्यांकन के आधार पर निर्णय लंबित।