IND vs WI : लकी मैदानात गिलनं फिफ्टी ठोकली; पण त्यानंतर लगेच उलटा फटका मारण्याचा डाव अंगलट आला!

लोकेश राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:50 IST2025-10-03T11:16:52+5:302025-10-03T12:50:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies 1st Test Day 2 Shubman Gill 8th Half Century Roston Chase Ends His Inning | IND vs WI : लकी मैदानात गिलनं फिफ्टी ठोकली; पण त्यानंतर लगेच उलटा फटका मारण्याचा डाव अंगलट आला!

IND vs WI : लकी मैदानात गिलनं फिफ्टी ठोकली; पण त्यानंतर लगेच उलटा फटका मारण्याचा डाव अंगलट आला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st Test Day 2 Shubman Gill 8th Half Century  : भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे गिलसाठी खास राहिले आहे. घरच्या अन् लकी मैदानावर पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याने ९४ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील ८ वे अर्धशतक झळकावले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रिव्हर्स स्विपचा नाद केला अन् वाया गेला

ही खेळी तो आणखी मोठी करेल, अशी अपेक्षा होती. पण उलटा फटका मारण्याच्या नादात तो फसला. वेस्ट इंडिजचा कर्णधाराच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप फटका मारण्याच्या नादात गिलनं आपली विकेट गमाली. बाद होण्याआधी त्याने लोकेश राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली होती.

Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे

शतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर फुटली केएल राहुल अन् शुबमन गिलची सेट झालेली जोडी

अहमदाबादच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपल्यावर यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुलनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली. पण ३६ धावा करून यशस्वी जैस्वाल माघारी फिरला. भारताच्या धावफलकावर ९० धावा असताना साई सुदर्शन ७ धावा करून तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिल अर्धशतक झळकावल्यावर लोकेश राहुलसोबत शतकी भागीदारीपासून फक्त २ धावा दूर असताना वेस्ट इंडिज कर्णधाराने त्याला बाद केले. शुबमन गिल हा तांत्रिकृष्ट्या सक्षम बॅटरपैकी एक आहे. तो उलटे सुटले फटके मारण्यापेक्षा सरळ बॅटनं धावा करायला पसंती देतो. पण भारताच्या डावातील ५७ व्या षटकात रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर त्याने रिव्हर्स स्विप फटका खेळला अन् तो फसला. 

Web Title : IND vs WI: शुभमन गिल का अर्धशतक, रिवर्स स्वीप में विकेट गंवाया!

Web Summary : अहमदाबाद में वेस्टइंडीज के खिलाफ शुभमन गिल ने अर्धशतक बनाया। राहुल के साथ साझेदारी के दौरान रिवर्स स्वीप करने की कोशिश में उन्होंने अपना विकेट खो दिया, जिससे एक आशाजनक पारी समाप्त हो गई।

Web Title : Gill hits fifty in lucky ground, fails playing reverse sweep!

Web Summary : Shubman Gill scored his eighth Test half-century against West Indies in Ahmedabad. While he partnered with Rahul, attempting a reverse sweep cost him his wicket, ending a promising innings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.